बीड

आवरगावचे माजी सरपंच प्रकाशराव नखाते यांचे दुःखद निधन


धारुर, आवरगावचे माजी सरपंच प्रकाशराव नामदेवराव नखाते यांचे शनिवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते, त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारा होता, त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात अनेक कामे केलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाने धारूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे, आज दुपारी एक वाजता आवरगाव येथील शेतात अंत्यविधी केला जाणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. नखाते कुटूबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!