बीड

बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल, औषध प्रशासनाची माजलगावात कारवाई, आयुर्वेदिक औषधे म्हणून अलोपथी मिश्रण केलेल्या बनावटी औषधांची विक्री

माजलगाव / प्रतिनिधी:
औषध प्रशासनाच्या छ.संभाजीनगर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून माजलगाव येथील छ.संभाजी महाराज चौक येथील नेटके आयुर्वेदिक औषधालय येथे आरोग्यासाठी घातक असलेले बनावटी औषधे तयार करून ती औषधे आयुर्वेदिक असे सांगून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच दि.०७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २:२० च्या सुमारास औषध प्रशासनाचे छ.संभाजीनगर व बीड चे सहाय्यक आयुक्त आर.एम.बजाज व सहआयुक्त डी.सी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, औषध निरीक्षक जी.द.जाधव व औषध निरीक्षक ब.दा.मरेवाड यांनी नेटके आयुर्वेदिक औषधालय,माजलगाव येथे दोन पंचासमक्ष धाड टाकली असता तेथे विक्री प्रतिनिधी श्रीमती निकिता श्रीराम भलभले या त्या ठिकाणी हजर होत्या . व दुकान मालक राहुल नेटके हे काही खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे माहिती दिली. यावेळी दुकानाची झडती घेतली असता ‘आयुर्वेदिक वात चूर्ण’, ‘आयुर्वेदिक मुळव्याध चूर्ण’, आयुर्वेदिक अस्थमा चूर्ण’ असे काही उत्पादने आढळली त्यावरील नमूद अन्न परवान्याची पडताळणी केली असता सदरील अन्न परवाना क्रमांक हा कुठेच नोंदणीकृत नसल्याचे समजले व या उत्पादनावर कुठल्याही उत्पादकाचे नाव व पत्ता नसल्याचे दिसल्याने सदरील औषधांचे नमुने तपासणी विश्लेषणासाठी संबंधित अधिकारी नमुना – १७ मध्ये आपल्यासोबत घेऊन गेले. सदरील औषधांची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला व सदरील औषधींमध्ये आयुर्वेदिक औषधांसोबत अलोप्याथिक औषधांची भेसळ असल्याचे व सदरील औषधी या बनावट तसेच आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे औषधी प्रयोगशाळेकडून घोषित केल्याने दि.१३ जून २०२४ रोजी औषध निरीक्षक जी.द.जाधव, छ.संभाजीनगर अति.कार्यभार बीड यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल मदन नेटके व निकिता श्रीराम भलभले यांच्या विरोधात भा.दं. वी. संहिता. १८६० च्या कलम ४२०,२७४,२७५,३४ तसेच औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम,१९४० च्या कलम ३३-I(ब),३३-I(१)(a)(ii),28-B नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक केतन राठोड हे करीत आहेत. सदरील संपूर्ण कारवाई औषध प्रशासनाचे छ.संभाजीनगर व बीड चे सहाय्यक आयुक्त आर.एम.बजाज व सहआयुक्त डी.सी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!