बीड

पंकजाताई मुंडे उद्या आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबियांना भेटणार

बीड ।दिनांक १४।
पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उद्या भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. जीव देऊन भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन काल त्यांनी केलं होतं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभर झाले. अशातच हा पराभव जिव्हारी लागल्याने सचिन मुंडे (येस्तार ता. अहमदपूर), पांडुरंग सोनवणे (डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई), पोपट वायबसे (चिंचेवाडी बीड) यांनी स्वतःचे जीवन संपवले. तरूणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूने पंकजाताई मुंडेंना अतिशय वेदना झाल्या, त्यांनी दूरध्वनीवरून त्यांचं सांत्वनही केलं होतं. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ शेअर करून तरूणांना संयम राखण्याचे देखील आवाहन केलेले आहे.

दरम्यान, पंकजाताई मुंडे आज संध्याकाळी परळीत येत असून उद्या त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संबंधित गावात जाणार आहेत, त्यांचं सांत्वन करून धीर देणार आहेत. दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!