बीड

मोह्याच्या इरफानचा सोनपेठात घातपात ?, जखमी अवस्थेतील गळफास घेतलेला मृतदेह

सिरसाळा : परळी तालुक्यातील मोहा येथील सतरा वर्षीय युवकाचा जखमी अवस्थेतील मृतदेह सोनपेठ ( जि.परभणी ) येथे आढळून आला आहे. तोंडातून,कानातून रक्तस्त्राव आणि पायाला जखमा दिसुन आला आहे.ह्या घटनेने सोनपेठ ,सिरसाळा,मोह्यात खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेत गळफास घेतलेला मृतदेह असल्याने ह्या युवकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इरफान अहमद सय्यद वय १७ वर्षे रा. मोहा , ता परळी असे त्या मयत युवकाचे नाव व पत्ता आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १२ वार बुधवार रोजी इरफान मोह्यातून आई – वडिल पेरणी करत असतांना काही कामाचे निमित्त सांगून सिरसाळ्याला आला ,आई- वडिलांना पाचशे रूपये सांगून घरातून तिन हजार रूपये घेऊन गेला .सिरसाळ्यातून इरफान सोनपेठ ला गेला, त्या ठिकाणी तो गेला काही समजू शकले नाही. त्याचा संपर्क होत नसल्याने व तो सोनपेठला गेला आहे हे मित्रा कडून समजले असल्याने आई – वडिलांनी सोनपेठ पोलीस स्टेशन गाठत मिसिंग तक्रार व्यक्त केली पंरतु काल दिनांक १३ रोजी इरफान ची खबर आली कि, सोनपेठ परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत इरफान चे मृतदेह आढळून आले आहे.
मृतदेह जखमी अवस्थेत होता . यावरुन इरफानच्या मृत्यू चे गूढ वाढले आहे.इरफान ने आत्महत्या केली का त्याला कोणी मारुन लटकवले असा प्रश्न निर्माण होत आहे. इरफानचा घात केला असल्याचा संशय या ठिकाणचे नागरिक व्यक्त करत आहेत.

इरफान सोनपेठला का गेला
: इरफान सोनपेठला का गेला ? असा प्रश्न निर्माण होत असतांना दुसरा प्रश्न असा निर्माण होत आहे कि, इरफान ला आत्महत्याच करायची होती तर त्याने आपल्या मोहा गावात केली असती,पंचवीस किमी दूर जाऊन आत्महत्या कशाला करेल ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. इरफानशी ऐनवेळी काही तरी घात झाला असणार यात काही शंका नाही . सर्व सत्य शवविच्छेदन अहवाला नंतर स्पष्ट होईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!