बीड

ताई पराभूत झाल्यास हा सचिन गेला, लातूर जिल्ह्यातील येस्तार येथील दुर्दैवी घटना, व्हिडिओ पोस्ट करणारा सचिन मुंडे यांचा अपघातात मृत्यु

लातूर दि. ८.
भाजपच्या नेत्या बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्यास मी जीवनात संपवून घेणार अस सोशल मीडिया मध्ये पोस्ट करणारे लातूर जिल्ह्यातील येस्तार येथील तरुण सचिन मुंडे यांचा सकाळीं एस टी च्या वळण रस्त्यांवर एकदम समोर आल्याने अपघातात मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान सचिन मुंडे यांचा मृत्यू अपघात की आत्महत्या यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे किनगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सकाळी बस निघाली असता रस्त्याच्या कडेला इसंम दिसला त्याला वाचवण्याची धडपड एस टी करत असताना एकदम तो मागच्या चांकामध्ये चिरडल्याने जागेवरच मृत्यू झाला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे.

कुटुंबाकडून माहिती अशी मिळाली की सचिन मुंडे पंकजा मुंडे यांचा चाहता कार्यकर्ता होता निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्यापासून तो अत्यवस्थ होता जेवण करत नव्हता चिडचिड करायचा असे त्यांचे कुटुंबांनी सांगीतले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!