बीड

देशातील प्रमुख नेत्यांच्या तुलनेत पंकजा मुंडेंना मिळाली अधिक मतं, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या बाजूने दिसली ओबीसींची एकजूट!

बीड ।दि. ०८।
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातील प्रमुख नेत्यांच्या तुलनेत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अधिक मते मिळाली आहेत. एका आकडेवारीनुसार हे स्पष्ट होत आहे. याशिवाय बीडमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी जिल्ह्यातील ओबीसींची मते मात्र त्यांच्या बाजूने एकवटली असल्याचे दिसून येते.

यंदा बीडची निवडणुक अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची झाली. जातीय ध्रुवीकरण यात प्रामुख्याने पहायला मिळाले. निवडणूकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंच विजयी होतील असे अंदाज पहिल्यापासूनच लावले जात असताना अगदी शेवटच्या क्षणात त्यांना अगदी थोड्या मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. तथापि विपरित परिस्थितीत त्यांनी दिलेला लढा हा लक्षवेधी ठरला. यंदा देशात जे काही प्रमुख नेते निवडणुक लढवत होते त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे वगळता इतर कांही नेत्यांना जी मते मिळाली त्यावर नजर टाकली असता त्यांच्या तुलनेत पंकजा मुंडे यांनाच अधिक मते मिळाल्याचे दिसून येते. पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार इतकी मते मिळाली तर त्यांच्या तुलनेत स्मृती इराणी यांना ३ लाख ७२ हजार, नितीन गडकरी ६ लाख ५५ हजार, नरेंद्र मोदी ६ लाख १२ हजार, सुधीर मुनगंटीवार ४ लाख ५८ हजार, प्रणिती शिंदे ६ लाख २० हजार, अखिलेश यादव ६ लाख ४२ हजार, श्रीकांत शिंदे ५ लाख ८९ हजार, कंगना रनौत ५ लाख ३७ हजार, राहूल गांधी ६ लाख ८७ हजार मते मिळाली.

ओबीसी एकवटला

बीडमध्ये मराठा विरूध्द ओबीसी टफ फाईट झाली. पंकजा मुंडेंना मिळालेली ६ लाख ७७ हजार मते पाहता या निवडणूकीत संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या बाजूने एकवटल्याचे चित्र दिसले. जातीय ध्रुवीकरणातून तयार झालेले हे गणित आगामी काळात देखील असेच राहील असे सध्या चित्र आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!