बीड

विपरीत परिस्थितीतील निवडणूकीत शेवटपर्यंत दिला लढा ; पंकजाताई मुंडेंच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतुकाची थाप !

परळी वैजनाथ ।दिनांक ०७।
बीड लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पक्षादेश येताच सर्वशक्तीनिशी रणांगणात उतरलेल्या पंकजाताई मुंडे या रणरागिणीने अतिशय विपरीत परिस्थितीतील निवडणुकीतही अखेरपर्यंत खंबीर लढा दिला. निसटता पराभव झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात व राजकीय क्षेत्रात दिलेल्या या लढ्याला वाखाणण्यात येत आहे. आज दिल्लीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पंकजाताई मुंडे यांना बळ देत त्यांची पाठ थोपटली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील बीडची लोकसभा निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बजरंग सोनवणे यांच्या लढतीमुळे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत ही निवडणूक साऱ्यांच्या नजरा खेचून घेणारी राहिली. ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती. मात्र, एवढ्या चुरशीच्या निवडणूकीतही पंकजाताई मुंडेंनी सन्माजनक मते खेचून आणली.प्रतिस्पर्धी उमेदवाराचा निसटता विजय झाला.
दरम्यान, आज दिल्लीत एनडीए संसदीय पक्षाची बैठक होती.या बैठकीस पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या. यावेळी भाजप व एनडीएतील बहुतांश सर्वच नेत्यांनी बीडच्या निवडणुकीत पंकजाताई मुंडेंनी अतिशय कठीण व विपरीत परिस्थितीतही मोठा लढा दिला याची वाखाणणी केली.एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी पंकजाताई मुंडे जेव्हा गेल्या त्यावेळी मोदींनी आशिर्वाद देत त्यांची पाठ थोपटली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!