बीड

अबब! लाचखोर सलगरकरच्या लॉकरमध्ये सापडले एक कोटी 61 लाख 89 हजारांचे घबाड, मिरज येथील लॉकरची बीड एसीबीने घेतली झाडाझडती, एसीबीच्या कारवायामुळे बीड जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांची झोप उडाली

बीड : परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या ते पीसीआरमध्ये असून एसीबीने आज त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लॉकरची झडती घेतली, यामध्ये लॉकरमध्ये एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली. एवढी मोठे सोने सलगरकर यांनी कसे कमावले? याअनुषंगाने आता पुढील तपास बीड एसीबी करत आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या नियोजनबद्ध कारवायामुळे लाचखोर अधिकाऱ्यांना मात्र धडकी भरल्याचे दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसीबी विभागाच्या वतीने अपुरे मनुष्यबळ असतानासुद्धा लाचखोरांना पकडण्याच्या कारवाया सुरूच आहेत. यामध्ये परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाचेच्या प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडले होते. यानंतर आज मिरज येथील त्यांच्या लॉकरची त्यांच्या समक्ष झडती घेण्यात आली. यावेळी लॉकरमध्ये एकूण 11 लाख 89 हजार रुपयांची रोखरक्कम, तसेच दोन किलो 105 ग्रॅम सोने असे एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली. यामध्ये झडती पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवार तसेच त्यांच्यासोबत हनुमान गोरे, अमोल खडसारे, अंबादास पुरी हे होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!