बीड

बारावीच्या परीक्षेत विभागात बीड जिल्हा प्रथम, बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 95.70 टक्के लागला निकाल

बीड,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 95.70 टक्के निकाल लागला आहे. बीड जिल्ह्याने बारावीच्या निकालात सर्वप्रथम येण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात वडवणी तालुक्याचा सर्वाधिक 97.31टक्के इतका निकाल लागला आहे. बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 40 हजार 248 मुला-मुलींनी नोंदणी केली होती. यापैकी 39 हजार 798 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 38 हजार 90 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 22 हजार 677 मुले आणि 15 हजार 413 मुली उत्तीर्ण झाले आहेत.मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.67 इतके असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.06 टक्के इतके आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा 94.21 टक्के निकाल लागला असून बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 95.70 टक्के इतका निकाल लागला आहे या पाठोपाठ परभणी जिल्ह्याचा ९०.४२ टक्के जालना जिल्ह्याचा 94.71टक्के तर हिंगोली जिल्ह्याचा 91.68 टक्के निकाल लागला आहे

तालुकानिहाय निकाल
वडवणी : 97.31 टक्के
बीड : 96.95 टक्के
पाटोदा : 95.29 टक्के
आष्टी : 94.95 टक्के
गेवराई : 95.84 टक्के
माजलगाव : 94.48 टक्के
अंबाजोगाई : 92.58 टक्के
केज : 96.71 टक्के
परळी : 95.74 टक्के
धारूर : 91.58 टक्के
शिरूरकासार 95.22 टक्के

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!