बीड

बीड एसीबीचा आर्थिक गुन्हे शाखेला मोठा दणका, मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी बीडची आर्थिक गुन्हे शाखा एसीबीच्या जाळ्यात, पाच लाखाची लाच घेतना खासगी इसमास पकडले, पोलिस निरीक्षकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू


बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा पोलिस दलाची आर्थिक गुन्हे शाखा आता अडचणीत सापडली आहे. जिजामाता मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर बीड एसीबीने कारवाई केली आहे. याप्रकरणात तब्बल पाच लाख रूपये घेताना एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिष खाडे, हे. कॉ. जाधवर, कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी हाती घेतली आहे. दरम्यान शिंदेंनी केलेल्या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमविण्याचे कुरण झाल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली होती. जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले. त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भुमिका कायम संशयास्पद राहिली. त्यातच आता जिजामाता मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. या बाबतची तक्रार बीड एसीबीकडे आली होती. तडजोडीअंती 30 लाख रूपये देण्याचे ठरले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात दहा लाख देण्यात येणार होते, त्यानुसार या दहा लाखापैकी पाच लाख रूपये स्विकारताना बीडमधील एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी बीड एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हे. कॉ. जाधवर आणि कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. बीड एसीबीने बीडमध्ये केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोˆˆठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!