(बीड प्रतिनिधी)
देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे , भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि देश सशक्तिकरणा साठी मोदीजींना मत द्यावेच लागेल, काळाची गरज ओळखून पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापनेचा संकल्प सर्व सामान्यजनतेने केला.
आज सामाजिक आणि राजकीय वातावरण गढूळ असले तरी,
आता विकासाची तुरटी फिरवावी लागेल. स्वर्गीय मुंडे साहेबां नंतर पुन्हा एकदा मिळालेली
विकासाची सुवर्णसंधी प्राप्त करावी लागणार आहे.
देशाचे धोरण आणि जिल्ह्याचा परिपूर्ण विकासाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक आहे. संधी न गमावता केवळ
विकास डोळ्यासमोर ठेवून भाजपा विचाराचा झुंजार लोकप्रतिनिधी
पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी चौसाळा येथील भाजपा प्रचार कार्यालय प्रसंगी केले.
बीड लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार
पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ
बीड विधानसभा मतदारसंघातील चौसाळा येथील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आला..
यावेळी राष्ट्रवादीचे नारायण बप्पा शिंदे,
भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद झोडगे, भाजपा दलित आघाडीचे अजय सवाई,
माजी सभापती काकासाहेब जोगदंड,
पस सदस्य सुनील झोडगे, पवन कुचेकर
सरपंच आप्पासाहेब झोडगे,दीपक काळे, सुंदर लांडगे, शिवाजी शिंदे, शहादेव चौधरी, संतोष तांदळे, भागवत तांदळे, भूषण झोडगे, मोहनराव जोगदंड, बबलू शिंदे, सलीम जहागीर,मिलिंद सोनवणे, कुमार मीटकरी, गणेश काकडे, ज्ञानेश्वर आंधळे, हत्तू दादा,सुधीर चौधरी साहिल सोनवणे अमोल कांबळे, शहादेव जोगदंड
आदी उपस्थित होते.
प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ नंतर चौसाळा गावात प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीस मतदार बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मतदान करण्याची ग्वाही दिली.