पाटोदा | दि.५।
बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन आपले नेतृत्व करण्याची संधी मला आपण सर्वांनी द्यावी. यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना जिल्ह्यातील गाव,वाडी, वस्ती तांड्यापर्यंत विकासाची गंगा आपल्याला आणता आली. तुमचे आशीर्वाद माझे नेतृत्व घडवत आहे, या निवडणुकीत सर्व महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात घरा-घरातील मतदान मिळवण्यासाठी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचावे.देशाच्या प्रगतीसोबत बीड जिल्ह्याची प्रगती करण्यासाठीची संधी चालून आली आहे असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
पंकजाताई मुंडे यांनी आज पाटोदा तालुक्यात प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधण्यासाठी चावडीभेट देत तालुक्यातील पाचंग्री, धनगर जवळका, पारनेर जवळवाडी, कुसळंब, पिंपळवंडी, अमळनेर, गोमळवाडा, कोळवाडी येथील ग्रामस्थांशी भेट घेतली. ठिकठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे महिला भगिनींसह ग्रामस्थांनी औक्षण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले.
पारगाव घुमरा येथील कार्यकर्ता बैठकीत पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी त्या म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासाचे व्रत मी स्वीकारले आहे. ही लढाई देश विकासाची आणि या लढाईत देशाच्या प्रगतीसोबत बीड जिल्ह्याची प्रगती करण्यासाठीची संधी आपल्याला चालून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे कणखर नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासात योगदान देण्यासाठी बीड जिल्ह्यातून मला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी तुम्ही द्या, मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेही तसुभरही कमी पडणार नाही. सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यासाठी माझी उमेदवारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेली उमेदवारी तुम्ही सार्थ ठरवण्यासाठी येत्या 13 तारखेला आपापल्या गावातून अधिकचे मताधिक्य मिळवण्यासाठी कष्ट घ्या, तुमच्या सर्वांच्या परिश्रमाचे मी जिल्ह्याचा विकास करून चीज करेल असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी याप्रसंगी बैठकीतून कार्यकर्त्यांना दिला.
या बैठकीला आ.बाळासाहेब आजबे, युवानेते अजय धोंडे, वाल्मीक निकाळजे, सुवर्णाताई लांबरुड, दीपक घुमरे, भागवत येवले, बाळा बांगर, पुष्पाताई सोनवणे, सुधीर घुमरे, बाबुराव जाधव, काकासाहेब शिंदे, बप्पासाहेब जाधव, सलीम चाऊस, गणेश भोसले, पद्माकर घुमरे, देविदास शेंडगे, नारायण नागरगोजे, बंडू सवासे, संपत घुमरे आदीजण उपस्थित होते.
••••