लोकाशा – वैष्णवी सेंटरमधून व्हिक्टरी खून करणारा पहिला योद्धा
बीड लोकाशा ऑनलाईन
बीड जिल्ह्यातील एकमेव सेवाभावी संस्थेच्या कोविड सेंटर मधून पहिला रुग्ण कोरोनावर मात करून घरी पोहचला . प्राची आकाश लांडे या चिमुकलीने कोरोनावर मात करून विजयी खून करून इतरांना लढण्याची प्रेरणा दिली .
बीड येथील वैष्णवी पॅलेस या वास्तू मध्ये जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटर लोकार्पित सेवाभावातून उभारणाऱ्या लोकाशा गोकुलधाम, वैष्णवी देवी मंदिर देवस्थान, माहेश्वरी जिल्हा महासभा, बीड तहसील, भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ, बीएलके बांधकाम ग्रुप यांचे कडून चालवण्यात येत असलेल्या केंद्रातील पहिला रुग्ण आज कोरोनावर मात करून घरी पोहचला . प्राचीचे वडील आकाश लांडे यांनी लेकीचा फोटो पोष्ट करून आपला आनंद शब्दबद्ध केला .
……
वैष्णवी पैलेस मधील सुविधा राजेशाही – आकाश लांडे
येथील सेंटर मध्ये अगदी तत्पर आणि शाही सुविधा असल्याचे मुलीचे वडील आकाश लांडे यांनी सांगितले . यासाठी आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत . माझ्या मुलीसोबत माझे आईवडील देखील याच ठिकाणी उपचार घेत असून ते हि लवकरच बरे होऊन परतणार आहेत . या ठिकाणी आरोग्य यंत्रणेचे व डॉक्टर यांचे सेवेबद्दल देखील आभार व्यक्त केले आहेत
………….