बीड शहरातील हे मंदिर आकाशातुन असे दिसते बीडचे कंकालेश्वर शिवमंदिर .
चारही बाजुने अथांगपाणी आणी मध्ये ताऱ्याचा आकार असणारं हे विहंगम दृष्य आहे. मराठवाड्यातील बीड शहरातील १० ते ११ व्या शतकातील कंकालेश्वर या प्राचीन शिवमंदिराचे. कल्याणीचा विक्रमादित्य चालुक्य ( सहावा ) यांच्या काळात उभारलेले हे शिवमंदिर स्थापत्य , शिल्प व भौगोलिक रचनेमुळे राज्यात प्रसिध्द आहे .
या शिल्पसमुहात लढवय्या स्त्रिया, ह्युआन चाँग,विनाधारी सरस्वती, रोमन योध्दा, नृत्यरत शिवाचे अन्य ठिकाणी न सापडणारे शिल्पे दिसतात.
या मंदिराच्या भोवतीचे अखंड वाहणारे जलस्त्रोत ,मंदिर स्थापत्य आणी शिल्प पाहुन शिल्पकारांच्या कलेला ही आपोआपच हात जुळतात.
मंदिराचा आकार आकाशातुन स्टार फिशप्रमाणे दिसतो.
कंकालेश्वर मंदिर एक दृष्टीक्षेप :
८४ -मिटर चौरसाकृती तळ्याच्या मध्यभागी बांधण्यात आले कंकालेश्वर मंदिर
१.५२ – मिटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तिरावर हे मंदिर उभे आहे
१६- सोळा स्तंभांवर मंदिराचे घुमटाकार छत पेललेले आहे.
११- व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने मंदिर बांधले
५०० – वर्षापासुन हे मंदिर.
स्त्रोत – मी बीडकर
(छाया – @Sachin Nalawade)