बीड ।दिनांक १७।
जिल्हयातील धनगर समाज पूर्णपणे भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे. तथापि समाजाच्या भल्यासाठी त्यांना विक्रमी मताधिक्य मिळणं आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी आज विविध बैठकांमधून केले.
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पद्मश्री विकास महात्मे यांनी आज बीड, गेवराई, माजलगाव, परळी या चार विधानसभा मतदारसंघात मॅरेथॉन बैठका घेऊन समाज बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना महात्मे म्हणाले, हा समाज लोकनेते मुंडे साहेबांना मानणारा आहे. पंकजाताईंनी धनगर समाजाच्या अडीच अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. समाजाच्या पाठिमागे मी ठामपणे उभा आहे असा शब्द त्यांनी मला दिला आहे. समाजाला योग्य प्रतिनिधीत्व आणि न्याय मिळावा याकरिता त्यांची गरज आहे. पंकजाताईचा विजय तर निश्चित आहेच पण त्यांना विक्रमी मताधिक्य मिळावं यासाठी समाज बांधवांनी एकजुटीने काम करावं असं आवाहन त्यांनी केलं.
विविध ठिकाणी भेटी, बैठका
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महात्मे यांनी गेवराईत प्रा. गणपतराव काकडे यांच्या घरी तर बीड येथे धनगर समाजाचे जागृत देवस्थान श्री खंडेश्वरी मंदिर परिसरात समाज बांधवांची बैठक घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयासही त्यांनी भेट दिली. शहरात त्यांनी उमेदवार स्वतः पंकजाताई यांची भेट घेतली. माजलगाव आणि परळी तालुक्यातही त्यांनी समाज बांधवांशी हितगुज साधून पंकजाताईंच्या विजयाचे आवाहन केले.
या दौऱ्यात त्यांचेसमवेत युवा मोर्चाचे सचिन जायभाये, धनगर समाज संघर्ष समितीचे अनंत बनसोडे, विठ्ठलराव रबदडे, फुलचंद बोरकर, शांतीलाल पिसाळ, ॲड ईश्वर कापसे, गजानन काळे, संतराम गडदे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
••••