बीड

जुगार्‍यांना कमलेश मिनांचा दणका, घाटावरील राधिका हॉटेलवर टाकली धाड,19 जुगारी गजाआड, 32 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त


नेकनूर, दि. 5 (लोकाशा न्यूज) : सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना व नेकनूर पोलिसांनी मांजरसूंबाच्या घाटातील राधिका हॉटेलच्या तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 19 जणांना ताब्यात घेतले आहे.या कारवाई पोलिसांनी तब्बल 32 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मागच्या काही दिवसांपासून नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी सुरु होत्या.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
              नेकनूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी जबाबदारी घेतल्यानंतर बालाघाटावर अवैध धंदे वाढल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून चांगल्याच वाढल्या होत्या.गोसावी आल्यापासून अवैध धंदे बोकाळल्याचे चित्र होते.त्यापार्श्वभूमीवर  सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांना राधिका हॉटेलमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार मीना व नेकनूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,पोलीस उपनिरीक्षक पानपाटील,पोलीस उपनिरीक्षक गटूवार,पोलीस अंमलदार चोपणे,श्री.मुंडे,इनामदार,श्री.वडने,श्री.क्षीरसागर,श्री सातपुते,श्री.राऊत,श्री.ढाकणे यांनी सापळा रचून राधिका हॉटेलवर छापा मारला.यावेळी हॉटेलमध्ये तिरट नावाचा जुगार खेळताना भगवान चंद्रकांत गरड,तात्यासाहेब अंबादास बहिर,अशोक सुधाकर घुले,अनिल ज्ञानोबा करडुले,सदाशिव उत्तम बिक्कड,अनंत शंकर शिनगारे,संदीप पिलाजी गोरे,जगदीश बाबासाहेब जगताप,संतोष अंबादास सोनावणे,किशोर अशोक मोराळे,तात्यासाहेब आत्माराम आमटे,प्रकाश रूपा राठोड,नितीन भगवान शिनगारे,जालिंदर भिवा त्रिमुखे,सुभम सुरेश चव्हाण,योगेश युवराज घुले,भीमा रामकिसन वाघमारे,रामा ज्ञानोबा भोसले,दशरथ राजाराम त्रिमुखे या 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या कारवाई तब्बल 31 लाख 74 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटावरील ही कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!