बीड

तुम्ही बुथ मजबूत करा, मी जिल्हा मजबूत करते – पंकजाताई मुंडे, पंकजाताईंचा विजय कीर्तिमान ठरणार – राजेंद्र मस्के

( बीड प्रतिनिधी )
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे संसदेत पवित्र झालेल्या जागेवर बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून प्रितमताई नंतर बसण्याची सुवर्णसंधी जनतेच्या आशिर्वादाने मिळणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी 13 मे पर्यंत अथक परिश्रम करा तुम्ही बूथ मजबूत करा.. मी जिल्हा मजबूत करते. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी पराकुटिचे प्रयत्न करणार. इथला तरुण मजबूत करणार. मशागत झाली आहे. विकासाचे भरघोस पिक घेण्यासाठी मतांची पेरणी करा. असे आवाहन बीड लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी बीड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता बैठकी दरम्यान केले.
खा. डॉ. प्रितमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, राम कुलकर्णी, प्रा. देविदास नागरगोजे, आदित्य सारडा, सलीम जहागीर, नवनाथ शिराळे, विक्रांत हाजारी, चंद्रकांत फड, रामराव खेडकर, वैजिनाथ मिसाळ, राणा डोईफोडे, अशोक लोढा, भारत काळे, सुरेश उगलमुगले, जालिंदर सानप, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, संगीता धसे, प्रकाश सोनसळे, जालिंदर सानप, सुनील मिसाळ, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीस बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक,जिप सदस्य, पस सदस्य, सरपंच उपसरपंच तथा सर्व भाजपा सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे सक्षम नेतृत्व आहे.वंचित, गोरगरीब कोणत्याही जाती धर्माचा असुद्या त्याला साथ देण्याची भूमिका पंकजाताईंची आहे. मंत्री असताना कोणताही भेदाभेद न करता प्रत्येक गाव खेड्यापर्यंत कोठ्यावधीचा निधी सढळ हाताने दिला. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकसित झाले. सर्व सामावेशक म्हणून आज त्यांची उमेदवारी उत्साहाने मतदार बांधवांनी स्वीकारली आहे. पुन्हा एकदा बीड लोकसभेत विजयाचे कमळ नुसते फुलणार नाही तर, पंकजाताईंचा विजय कीर्तिमान ठरेल. असा विश्वास यावेळी राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, सर्जेराव तांदळे, सलीम जहागीर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
धनगर समाजाचे नेते प्रकाश सोनसळे, धनगर समाज संघटना, विकास ढोरमारे, युवा धनगर समाज संघटना, बंजारा समाज, गोंधळी समाज, जिल्हा लोक कलावंत समाज, शिरूर ता. मातंग समाज संघटना, शिरूर ता. माळी समाज यांनी पंकजाताईंचे स्वागत करून विजयासाठी पाठींबा दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!