बीड

बीड जिल्हा परिषदेचा सन 2024-25 या वर्षासाठीचा शिल्लकीच्या एकूण १६ कोटी ८३ लक्ष रुपयाच्या अर्थसंकल्पास मंजुरी

बीड

बीड दि.7 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेच्या महसुली जमा व खर्चाच्या अंदाजपत्रक यांनी सन 2024-25 या वर्षांमध्ये जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्न पोटी आरंभीच्या शिलकेसह अपेक्षित महसुली खर्च 16 कोटी 83 लाख 36 हजार 537 इतकी आहे. प्रस्तावित खर्च 16 कोटी 12 लक्ष 90 हजार 665 इतका आहे. तर एकूण 17 लक्ष 25 हजार 872 इतका महसुली शिलकीच्या अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीतादेवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सन 2014 पासुन पहिल्यांदाच यावर्षी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
दिनांक 7 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत ठराव क्रमांक 1 अन्वये विभागनिहाय खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
विभाग निहाय खर्च पुढील प्रमाणे आहे. बांधकाम विभाग 1 कोटी 78 लक्ष 49 हजार, शिक्षण विभाग 1कोटी 20 हजार 43 हजार 750, आरोग्य विभाग 59 लक्ष चार हजार पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग 3 कोटी 30 लक्ष, समाज कल्याण विभाग तीन कोटीत 13 लक्ष 45 हजार 715 रुपये, महिला व बालकल्याण विभाग 90 लक्ष 5 हजार रुपये, कृषी विभाग 13 लक्ष 75 हजार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग 81 लक्ष 85 हजार, वनीकरण विभाग व व्याज 10 हजार 100, पंचायतराज कार्यक्रम विभागातर्गत 4 कोटी 23 लक्ष 72 हजार, लघुपाटबंधारे विभाग दोन लक्ष एक हजार शंभर याप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी खालील प्रमाणे निधी समानता देण्यात आली आहे. समाज कल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीयांना शेळी गट पुरविणे 1 लक्ष 49 हजार, सामाजिक सुरक्षा व दिव्यांग दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगाने पिठाचे चक्की वाटप करणे 45 लक्ष 15 हजार 430, सामाजिक सुरक्षा व दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगना तीन चाकी व कृत्रिम अवयव पुरविणे यासाठी 17 लक्ष 425 रुपये, महिला व बालकल्याण विभागानंतर मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण 9 रुपये, महिला व बालकल्याण विभाग इयत्ता सातवी ते बारावीच्या मुलींना संगणक प्रशिक्षण 25 लक्ष रुपये, कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन अनुदान 12 लक्ष रुपये, पशुसंवर्धन अंतर्गत गाव तेथे खोडा अंतर्गत ग्रामपंचायतीना खोडा पुरविणे 20 लक्ष रुपये, शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शाळेच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी 72 लक्ष 69 हजार 750 रुपये, आरोग्य विभागांतर्गत दुर्धर पिडितांना अर्थसहाय्य रुपये 15,000/ प्रति लाभार्थी याप्रमाणे 15 लक्ष रुपये, तर पंचायत राज कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन 5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पीय बैठकीस बीड जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!