बीड

खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश, बीडच्या शिवतीर्थाला जोडणारा रस्ता होणार चौपदरी, बार्शी नाका ते शिवाजी चौक रस्त्यासाठी अट्ठेचाळीस कोटीच्या निधीला मान्यता, शहराच्या भौतिक वैभवात पडणार आणखी एक भर


बीड. दि. २८—-अनेक दिवसांपासून रुंदीकरण आणि दुरुस्तीची मागणी होत असलेल्या बार्शी नाका ते शिवाजी चौक रस्त्याचे खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे भाग्य उजाळले आहे. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बार्शी नाक्यापासून शिवाजी चौकापर्यंत चौपदारी होणार असून याकामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने अट्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

बीड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण करावे अशी मागणी बीडकरांकडून वारंवार करण्यात येत होती, या मागणीची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदरील रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी केली होती, तसेच खा. मुंडे यांच्याकडून याकामी सातत्यपूर्ण पत्रव्यवहार देखील सुरु होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बीडकरांची मागणी देखील पूर्ण झाली आहे.

खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चौपदरीकरण करण्यासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या कामासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा मार्ग आता अडथळे मुक्त होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि “बीड शहरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन बार्शी नाका-शिवाजी चौक रस्त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या मार्गातील वाहतूक समस्येची माहिती आणि चौपदरीकरणाच महत्व मांडल होत, आपल्या जिल्ह्यातील शिवतीर्थाला जोडणारा हा रस्ता चौपदरी आणि दर्जेदार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि नितीन गडकरी यांचे आभार” अशा शब्दात खा. प्रितमताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करून केंद्र सरकारचे आभार मानले.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!