बीड

खा. प्रीतमताईंच्या कष्टाचे चीज झाले, 28 फेब्रुवारीला आष्टी ते अंमळनेर रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, खा. मुंडे अंमळनेर रेल्वे स्थानकावर उद्घाटनासाठी थांबणार


बीड, नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी मागच्या दहा वर्षापासून खा. प्रीतमताई मुंडे यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज होताना पहायला मिळत आहे, आता दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अंमळनेर या 32 किलो मिटर रेल्वे मार्गाचे
28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व खा. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.

नगर बीड परळी रेल्वे मार्ग हा बीडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, या मार्गासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या जीवाचे राण केलेले आहे, त्यांच्यानंतर या मार्गासाठी पालकमंत्री म्हणून पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी लढा सुरू केला, त्यानुसार पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गासाठी निधीचा वर्षाव करण्यास सुरवात केली, त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम खऱ्या अर्थाने गतीने सुरू झाले, या कामासाठी प्रीतमताईंनी प्रचंड मेहनत घेतली, जिथे जिथे अडचणी आल्या त्या त्या अडचणी त्यांनी तात्काळ सोडवून घेतल्या, त्यामुळे पहिल्या टप्प्यात नगर ते आष्टीपर्यंत रेल्वे धावू लागली, आणि आता दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अंमळनेर या 32 किलो मिटर अंतरावरील रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे, त्या अनुषंगानेच या मार्गाचे दीं. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन आष्टी-अंमळनेर रेल्वे मार्गाचे ऑनलाईन पध्दतीने
उद्घाटन होणार आहे, यावेळी स्वतः खा. डॉ. प्रीतमताई मुंडे या अंमळनेर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्स लिंकद्वारे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खा. मुंडे यांच्यासह बीडकरांशी संवाद साधनार आहेत. या मार्गासाठी मागच्या दहा वर्षापासून खा. प्रीतमताई मुंडे यांनी प्रचंड मेहनत घेतली असून त्यांच्या याच मेहनतीचे आज खऱ्या अर्थाने चीज होत असल्याचे पहायला मिळत आहे. आष्टी या तालुक्यानंतर आता पाटोदा तालुक्यातूनही रेल्वे धावताना दिसणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!