बीड, दि.17 (लोकाशा न्युज) ः- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांना बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले अपर जिल्हाधिकारी जितेंद्र सिताराम वाघ यांची अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाने शनिवारी दि.17 फेबु्रवारी रोजी जारी केले आहेत. दरम्यान, अंबाजोगाईला आता नियमित अपर जिल्हाधिकारी मिळाल्याने कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे.
