बीड : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2319 वर गेली आहे, कोरोनाची संख्या वाढली असली तरी यातून बरे होण्यार्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. आज कोरोनामुक्तचा आकडा शतक पार करणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 106 रूग्ण आज कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 14, आष्टी 5, पाटोदा 1, गेवराई 32, माजलगाव 6, धारूर 2, केज 11, अंबाजोगाई 6, परळी तालुक्यातील 29 असा 106 जणांना आज सुट्टी देण्यात येणार आहे. 1271 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 969 बरे झालेले आहेत. तर 59 जणांचा मृत्यू झालेला आहे, कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, एसपी हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांच्यासह त्यांची संपूर्ण टिम आपला जीव मुठीत घेवून काम करत आहे, त्यामुळे या सर्व कोरोना योध्द्यांना जिल्ह्यातील नागरिकांनी पुर्णपणे सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोनाला सहजणपणे हरविता येणार आहे.
—