धारूर
धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील 41 वर्षीय नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर दारू पिऊन , मारहाण करत अत्याचार केला त्यात मुलगी गर्भवती जाली असून या अत्याचाराची माहिती आईला दिली या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला असून आरोपीला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
धारूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे दारुड्या बापाकडून मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक ची माहिती उमराई येथील कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंब चालवते विशेष म्हणजे हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते या यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिला आईला सांगितले असता तिच्या आईने तिला अंबाजोगाई येथे सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचं सांगून मुलीला रुग्णालयातील प्रसूती वार्डामध्ये ऍडमिट होण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांच्याकडे कपडे किंवा कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याने मुलगी आईसह ऊस तोडणीच्या ठिकाणी कोपी मध्ये रात्र काढून दुसऱ्या दिवशी सात फेब्रुवारी बुधवार रोजी परत रुग्णालयात येऊन प्रसूती वार्डामध्ये दाखल झाली.यावेळी अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्याखाली राहत्या घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन अनेक वेळा मारहाण करत अत्याचार केल्याची आपबिती कथन केले यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून मध्यरात्री मध्ये धारूर पोलीस स्टेशन मध्ये नराधाम वडील यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी आरोपीला गुन्हा नोंद होताच दोन तासांमध्ये अटक केली. या कारवाई मध्ये धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद बासटे, पोलीस नाईक निरर्डे ,पोलीस कॉन्स्टेबल टकले पोलीस कॉन्स्टेबल काळे, महिला पोलीस कर्मचारी राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख जमीर सह आधी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.