बीड, दि.31 (जिमाका) : भारतीय सण उत्सव हे महिला प्रधान आहेत. या सण उत्सवांमध्ये महिला एकत्रित येतात. एकत्रित आलेल्या जिल्हयातील महिलांनी बालविवाह निर्मूलनाचा संदेश द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मूधोळ-मुंडे यांनी केले.
मकरसंक्राती हा सण जिल्हयातील महिला उत्सवात साजरा करीत आहेत. या निमित्त घरोघरी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम केवळ महिलांचा असतो या आणि अशा कार्यक्रमातून बालविवाह निर्मूलनाचा महत्वाचा संदेश महिलांनी आपल्या सख्यांना द्यावा.
बालहविवाह करणे बेकायदेशीर तर आहे. तसेच शारिरीकरीत्या ही मुलींना/महिलांना धोकादायक आहे. बालविवाह झाला तर मुलींच बालपण हिरावून त्यांना संसारिक आयुष्याच्या जबाबदा-या साभांळाव्या लागतात. त्या पेलण्यास मुलींची मानसिक तसेच शारिरीक तयारी नसते. लवकर लग्न केल्यामूळे मुलींना विविध शारिरीक व्याधीनांही सामोरे जावे लागते. ज्याप्रमाणे रोपटयाचे झाड झाल्याशिवाय फळ लागत नाही. त्याचप्रमाणे 18 वर्ष वयाच्यावर लग्न केल्यास मुलींचा शारिरीक मानसिक विकास होतो. त्यामूळेच जिल्हयात होणा-या हळदी कुंकू आणि तत्सम सण-उत्सवामध्ये बालविवाह निर्मूलनाचा संदेश महिलांनी देणे गरजेचे आहे.
असा सकारात्मक संदेश समाजात वाढविल्यास जिल्हयातील मुलींचा आकडा ही वाढेल. त्याचा फायदा कुंटुंबासह जिल्हयाला होईल. सावित्रीबाई फुले यांनी सांगितल्याप्रमाणे मुलगी शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते. मुलींना शिकवा त्यांच्या पायावर उभे होऊ द्या असा संदेश हळदी कुंकू कायक्रमानिमित्त द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.