बीड । दि.२७ । ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा’ खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सदृढ आणि अधिक गतिमान करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कटिबद्धतेने कार्यरत राहावे’ अस आवाहन त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना या बैठकीत केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातच नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न झाली. बीड जिल्ह्यातील रेल्वे आणि आरोग्य विषयक प्रश्नांवर खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रशासनासोबत मॅरेथॉन बैठकी संपन्न झाल्याने सर्वसामान्यांशी निगडित प्रश्नांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, औषधसाठा, मनुष्यबळ, सामग्री आणि आवश्यक यंत्रणेवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था परिपूर्ण असावी, सोबतच गतिमान देखील असावी यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचे खा. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले, आरोग्य यंत्रणेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासह व्यवस्थेला बळकट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागांमध्ये शवविच्छेदनाच्या प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी निदर्शनास येत आहेत, शवविच्छेदनासाठी आवश्यक सामुग्रीच्या अभावामुळे मृतदेह आणि नातेवाईकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधा आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्लॅगशिप योजना असलेल्या टीबी मुक्त भारत अभियानाचा आढावा देखील या बैठकीत खा. मुंडे यांनी घेतला. क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कटाक्षाने चाचण्या घेण्यासह प्रौढ आणि अल्पवयीन रुग्णांचे वर्गीकरण करून अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना खा.मुंडे यांनी केली. बीड जिल्ह्याला मोबाईल एक्स-रे व्हॅन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे भुसंपादनातील त्रुटी आणि मावेज्याचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांच्या मालकी हक्काबाबत सुरू असलेले वाद कायदेशीर मार्गाने मिटवून भुसंपादनातील त्रुटी दूर कराव्यात आणि मावेज्याचे प्रश्न सोडवून प्रकल्पाला गती द्यावी अशी सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वेच्या बैठकीत केली. दरम्यान शिरूर तालुक्यातील विघ्नेवाडी रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरिता रस्ता नसल्याची स्थानिकांशी तक्रार सोडविण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे बैठकीतुन शिरूरच्या तहसीलदारांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आणि तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्था कर