अंबाजोगाई/प्रतिनिधी: येथील दीनदयाल वसाहतीत घराच्या पोर्च मद्ये घुसून दुचाकी जाळून, घरावर पेट्रोल चे बोळे फेकणाऱ्या एका शिक्षकावर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही मद्ये कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
शहरातील योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षक दिनकर वासुदेव जोशी हे दीनदयाल वसाहतीत राहतात. ते त्यांच्या घरात झोपलेले असताना त्यांच्याच शाळेतील शिक्षक कमलाकर कोंडीबा राऊत यांने त्यांच्या घराच्या पोर्च मद्ये जाऊन पेट्रोल चे बोळे टाकून दुचाकी पेटविल्याने ती जळून खाक झाल्याची घटना दि. 14 जानेवारी रोजी पहाटे घडली होती. या आगतील जोशी यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुचाकी पेटवून उडी मारुन पळून जातांना जोशी यांनी व त्यांच्या पत्नीने राऊत यास पाहीले होते. संस्थेची बदनामी होईल यामुळे दिनकर जोशी यांनी राऊत याच्या विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली नव्हती. हा प्रकार घडल्या नंतर जोशी यांनी आपल्या घराला दि. 15 जानेवारी रोजी सीसीटिव्ही बसून घेतले होते. गाडी जाळण्याचा प्रकार केल्यांनतर दि. 17 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या पुढे राऊत याने जोशी यांच्या घरावर पेट्रोल चे पेटलेले बोळे फेकून घर जाळण्याचा प्रकार केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दिनकर जोशी यांच्या फिर्यादी वरून त्यांच्याच शाळेत शिक्षक असलेल्या कमलाकर कोंडीबा राऊत याच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राउत यास राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्कार
दरम्यान, आरोपी शिक्षक कमलाकर राऊत हा पीएचडी धारक उच्चशिक्षित शिक्षक असून त्याचे शिक्षण कार्यातील योगदान लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व्वोच्च पुरस्कार प्राप्त शिक्षकावर अशा प्रकारच्या कृत्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.