बीड

बीडमध्ये महिणाभर चालणार राज्य रस्ता सुरक्षा अभियान, जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते झाले अभियानाचे उद्घाटन, सर्वांनी नियम पाळले तर अपघाताचे प्रमाण आपोआप कमी होईल – मुधोळ


बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे दि. 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित केलेले आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन 2024 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्ताने विविध विभागाने विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने सदर अभियानाचा उद्घाटन सोहळा सोमवारी सकाळी रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या ह्स्ते व अध्यक्षतेखाली पार पडला.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी केली, त्यांनी प्रस्तावनेत दरवर्षी महाराष्ट्रामध्ये अपघातामध्ये सुमारे दिड लाख लोक मृत्युमुखी पडतात. सदर अपधात होवू नये म्हणून त्यांनी वाहन चालवताना हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करावा तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, दारु पिवून वाहन चालवू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये या सुरक्षा विषयक पंचसूत्रीची माहिती उपस्थित विद्यार्थी, वाहन चालक यांना दिली. सदर कार्यक्रमास विशेष निमंत्रित मा.श्री.जी.जी. सोनी, सचिव जिल्हा, विधी सेवा प्राधिकरण, बीड यांनी देखिल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी गोल्डन अवर्स गुड समारिटनचे महत्व व अपघात टाळणे व कमी करणे करीता शासनाच्या कायद्याच्या विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनतर  सचिन पांडकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पोलीस विभागाचे रस्ता सुरक्षे विषयीचे कार्य विशद केले व सुरक्षेचे नियम मोडणा-यांना दंड व शिक्षा याबाबत जनजागृती केली. सदर कार्यक्रमास उपस्थित मा. श्रीमती करिष्मा नायर, मा. सहा. जिल्हाधिकारी, बीड यांनी देखिल मोलाचे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षे संबधी सर्वात आधी आपल्या पालकांमध्ये जनजागृती करुन प्रचार व प्रसार कशा पध्दतीने करावा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषनामध्ये दिपा मुधोळ यांनी देखिल रस्ता सुरक्षा विषयक मोलाचे मार्गदर्शन केले रस्त्याने आपणास अतिवेगाने जाणारी वाहने जास्त दिसतात, विना हेल्मेट चालणारे चालक दिसतात, अधिक आसन क्षमतेने जाणारे वाहन चालक दिसतात हे सर्व नियमांची पायमल्ली करणार्‍या बाबी असून यामध्ये बदल झाल्यास निश्चितच अपघताचे प्रमाण कमी होवून रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.  तसेच सदर कार्यक्रमास श्री, शिवराज कराड, विभागीय वाहतूक अधिकारी, श्री. नितीनचंद्र कोटेचा, विशाखा समिती अध्यक्षा श्रीमती मधुमती कोटेचा, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा श्रीमती गोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री बनसोडे, चंपावती विदयालयाचे प्राचार्य, चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. काकडे, ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष श्री. वंजारे, ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व वाहन चालक, मालक व प्रतिनिधी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम दि.15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.30 वाजता, छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल मैदान येथे मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रस्ता सुरक्षा समिती बीड यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्यासह इतर अधिकारी आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!