बीड

परळीत चाललय तरी काय? अवघ्या ७२ तासात सापडले दुसरे तीन दिवसीय स्त्री जातीचे अर्भक ; परळी ग्रामीण पोलिसांनी हस्तगत करून उपचारार्थ दाखल केले उपजिल्हा रुग्णालयात


परळी वैजनाथ दि ११ (लोकाशा न्यूज) :-
परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर एका निर्दयी मातेने पोत्यात गुंडाळून फेकलेले एका आठ महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सापडले या घटनेस चार दिवस उलटत नाही तोच आज परळी नंदागौळ रोडवरील कचऱ्याच्या डम्पिंग लगत एक तीन दिवसीय स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परळी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदर अर्भक परळी ग्रामीण पोलिसांनी हस्तगत करून उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर एका निर्दयी मातेने आठ महिन्याच्या स्त्रि जातीच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकले होते त्यावेळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि टीमने सदर मुलीस हस्तगत करून उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सदर घटनेस ७२ तास उलटत नाही तोच आज रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा परळी नंदागौळ रोडला कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड लगत एक तीन दिवसीय अर्भक कपड्यात गुंडाळून फेकले असल्याची माहिती वसंतनगरला जाणाऱ्या एका अज्ञात इसमाने परळी ग्रामीण पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे,
तुळशीराम परतवाडे, व्यंकट डोरनाळे, महादेव वाघमारे आदींनी त्वरित घटनास्थळ घाटीत सदर अर्भकास ताब्यात घेऊन उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रभाकर उपचार सुरू असून तब्येत चांगली आहे. सदर घटना ही परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याबाबत नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.
स्त्री जातीच्या बाळाला अर्भकाला फेकण्याची गेल्या ७२ तासात दुसरी घटना असून ‘त्या’ निर्दयी माता कोण ? हे शोधणे एक पोलिसांपुढे आव्हानच उभे राहिले आहे. ह्या घटनेने मात्र परळी शहरासह तालुक्यात खबर माजली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!