बीड

केंद्रीय पथकाने अनुभवली जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता, दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी पथकासमोर मांडल्या व्यथा, पिके हातची गेल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट, तलावात आणि जमिनीतही पाणी नसल्याने चार्‍यासह पाणीबाणी निर्माण होण्याचे संकेत, पथकाने जिल्ह्यातील दाहकतेचा पाँईट टू पाँईट लक्षात घेतला, जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा केंद्राला देणार अहवाल



बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : खरिप हंगामात झालेला कमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच भुजल पातळीत झालेली घट व संभाव्य पाणी टंचाई यापार्श्वभुमीवर केंद्रीय पथकाने गुरूवारी बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थ आणि अधिकार्‍यांशी चर्चा करुन माहिती घेतली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहूण केंद्राचे पथकही हतबल झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी शेतकर्‍यांनी पथकासमोर आल्या व्यथा मांडल्या. दुष्काळामुळे पिके हातची गेल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. तलावात आणि जमिनीत पाणी नसल्यामुळे जिल्ह्यात येणार्‍या काळात चार्‍यासह पाणीबाणीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. पथकाने याच दाहकतेचा पाँईट टू पाँईट लक्षात घेतला, याच दाहकतेचा ते केंद्राला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे आता केंद्र काय निर्णय घेते याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
        केंद्राच्या पथकाने जिल्ह्यातील बीड, वडवणी, धारुर तसेच शिरुर कासार मधील अनेक ठिकाणी भेटी दिल्या. केंद्रातील  कृषी सचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्हयात आले होते. या पाहणी दौर्‍यात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, परविक्षाधीन भा.प्र.से.अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर,  तहसीलदार सुहास हजारे आदिंची उपस्थिती होती. या पथकाने बीड तालुक्यातील घोडका राजूरी तसेच वडवणीतील पोखरी, ढोरवाडी, वडवणी, चौफलदरी तांडा, मोरवड, पुसरा, धारुरमधील भोपा, शिरुरमधील मालकाची वाडी, हिवरसिंग, खोकरमोहा, रायमोहा आदि गावात पिकांची तसेच पाझर तलाव व साठवण तलावांची पाहणी केली व शेतकर्‍यांचे म्हणने ऐकुन घेतले. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 79 टक्के इतकाच पाऊस पडला असून संपूर्ण पावसाळयात केवळ सरासरी 3.5 दिवस पावासाचे राहीले. यावर्षी कमी पावसाने सोयाबीनसह कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सरासरी उत्पन कमी झाले आहे. या दौर्‍याची सुरुवात खोडका राजूरी येथील पाझर तलाव पहाणीने झाली. हा पाझर तलाव आटला असून या ठिकाणी असणार्‍या विद्यमान स्थितीची आणि संभाव्य पाणी टंचाईची माहिती पथकाला यावेळी देण्यात आली. त्यानंतर पोखरी येथील शेतकरी काशिनाथ काळे यांच्या शेतातील कापूस पिकाची पहाणी पथकाने केली. काळे यांच्या शेतात पावसाअभावी कमी असण्याची शक्यता दिसून आली. यानंतर वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथेही पथकाने शेतातील कापसाच्या पिकाची पहाणी केली. शेळी व म्हशीच्या गोठ्याची पाहणी करताना पथकाने उपलब्ध चारा आणि जनावरांसाठीचे पाणी याबाबत विचारणा केली. तांड्यावर पिण्यास पाणी असले तरी जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही असे राठोड यांनी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांनी पथकाला दिली
जिल्ह्यातील दाहकतेची संपूर्ण माहिती
बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सध्या गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या गांर्भियाने काम करीत आहेत.  त्यानुसार त्यांनी काल जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेची केंद्रीय पथकाला संपूर्ण माहिती दिली. येथील विश्रामगृहावर केंद्रीय पथकाबरोबर एक बैठक झाली, या बैठकीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच इतर यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या पाहणी पथकात केंद्रीय कृषी उपसचिव के. मनोज, निती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मिणा, विधी विनीयोग विभागाचे जगदिश साहू आदींचा समावेश होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!