बीड

सोळंके कारखाना यंदा ऊसाला रु. २९००/- पेक्षा जास्तीचा भाव देणार, आ. प्रकाशदादा सोळंके

माजलगाव दि ५ (बातमीदार)
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना ही माजलगाव मतदार संघात ऊस उत्पादकांची कामधेनू असून, या कारखान्याने गेल्या ३१ वर्षापासून ऊस उत्पादकांना सातत्याने जास्तीचा ऊसभाव देण्यास कटीबध्द राहिला असून ही परंपरा याहीवर्षी कायम ठेवत यंदा ऊसाला रु.२९००/- पेक्षा जास्तीचा भाव देण्याची घोषणा कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा साखर संघाचे उपाध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके यांनी ३२ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केली.

तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३/२४ चा ३२ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र साखर संघाचे उपाध्यक्ष आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके, व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. सोळंके म्हणाले की, लोकनेते सुंदररावजी सोळंके साहेब यांनी उभारलेला हा कारखाना उस उत्पादकांची कामधेनू म्हणून ओळखला जात असून या कारखान्याने स्थापने पासून अविरतपणे गाळप हंगाम चालू ठेवत प्रत्येक गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकन्यांचा ऊसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्तीचा भाव देत ऊस उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला. लोकनेते स्व. सुंदररावजी सोळंके साहेबांची ही परंपरा त्याच्या आशिर्वादाने त्यांच्या पश्चात ही चालूच असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, यंदा पाउस काळ कमी झाल्याने साखर कारखानादारीसाठी हे वर्ष मोठे खडतर असून, अल्प पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने ठरविलेले उद्दिष्ट पुर्ण करण्याचे मोठे आवाहन आपल्यासमोर असून हे आवाहन यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व उस उत्पादकांनी बोहरील कारखान्याला आपला उस न देता आपल्या हक्काच्या कारखान्यास दयावा. ज्या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी आपला उस दिला नाही त्यांनी यावर्षी आपला उस हा कारखाना घेईल का याबद्दल कसलीच शंका न बाळगता आपला उस सोहंके कारखान्यास देवून सहकार्य करावे असे आवाहन करत मागील ३१ वर्षांप्रमाणेच याही वर्षी इतर कारखान्याच्या तुलनेत आपला सोळंके कारखाना उसाला प्रतिटन रु.२९००/- पेक्षा जास्तीचा ऊस भाव देवून शेतकऱ्यांचे हित जोपासणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा यावेळी आ. सोळंके यांनी करून उस भाव बद्दल होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला. तर या घोषणामुळे उपस्थित उस उत्पादक शेतकऱ्यासह सभासदांनी या घोषणेचे टाळयाच्या गजरात स्वागत केले. यावेळी कार्यक्षेत्रातील माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यासह माजलगाव मतदार संघातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर व सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, कामगार, ठेकेदार, मुकादम आदिसह नागरिक उपस्थित होते.

—-चौकट—-
माता वैष्णवीदेवी आर्शिवादाने, आई-वडीलांची पुण्याईने व आपल्या प्रेमामूळे आम्ही सर्व परिवार सुखरूप .. आ. सोळंके

घरावर झालेल्या हल्या संदर्भात बोलताना आ. सोळंके म्हणाले की, लोकनेते सुंदररावजी सोळंके साहेब हे १९६२ पासुन या मतदार संघातील लोकांची सेवा करत असून त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवत असल्याचे म्हणत गत ३६ वर्षापासुन माजलगाव मतदार संघाच्या समाजकारण, राजकारणात सक्रीय राहून येथील लोकांची सेवा करत असून, यात सर्व जाती धर्माच्या लोकांची असल्याने खंबीर साथ, आशीवाद व मोलाचे सहकार्या असून त्यामूळेच मी चार वेळा आमदार, मंत्री झाल्याचे त्यांनी म्हटले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमची दारे कायम उघडी असल्याचे त्यांनी सांगत परवा जो हल्ला झाला तो माझ्या काही विरोधकांनी मला संपवण्याचा डाव असल्याचे सांगत त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्यामूळे त्यांनी मराठा आंदोलनाच्या आडून हे हल्ला केल्याचा आरोप करत, मराठा आंदोलनाला आमचा कायम पाठिंबा असून, मराठा आरक्षणाचा सर्व आंदोलनात आमचा सातत्याने सहभाग असल्याचे म्हणत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून जरांगे पाटीलांचे आंदोलन यशस्वी होवून दोन महिन्यात मराठा आरक्षण मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त करत, आमच्यावर झालेल्या या हल्यातून मी व आमचा सर्व परिवार आपल्या सर्वांच्या प्रमामूळे व आर्शिवादामूळे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो असून विरोधकांचे कूठलेही मनसूबे यशस्वी होवू देणार नसल्याचे आ. सोळंके यांनी म्हटले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!