बीड

मराठवाड्यातील चौथ्या रेललाईन दुहेरीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा, परभणी-परळी वैजनाथ 64 किमीच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या जमिन अधिग्रहणाची अधिसुचना अखेर रेल्वे मंत्रालयाकडून जारी, खा. प्रीतमताईंच्या प्रयत्नांना मोठे यश, नगर-बीड-परळी रेल्वेचे कामही प्रगतीपथावर, लवकरच होणार पूर्ण


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) :  जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यात ज्याप्रमाणे महामार्गांचे जाळे विणले अगदी त्याचप्रमाणे रेल्वे लाईनचेही जाळे त्या बीड जिल्ह्यात निर्माण करत आहेत. त्यांच्या माध्यमातूनच आता मराठवाड्यातील चौथ्या रेललाईन दुहेरीकरणाच्या कामाचा श्रीगणेश झाला आहे. परभणी- परळी वैजनाथ या 64 किमीच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या जमिन अधिग्रहणाची अधिसुचना रेल्वे मंत्रालयाकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. यासाठी खा. प्रीतमताईंनी सातत्याने प्रयत्न केले होते, या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा परळीसह बीडकरांना मोठा फायदा होणार आहे. या दुहेरीकरणामुळे नविन रेल्वेच्या गाड्याही भविष्यात वाढणार आहेत. तसेच खा. प्रीतमताईंच्याच नेतृत्वात सध्या नगर-बीड-परळी रेल्वेचेही काम प्रगतीपथावर आहे. हेही काम लवकरच पुर्ण होईल, असे रेल्वे विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लवकरच नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरून बीडकरांना प्रत्यक्ष रेल्वे धावताना पहायला मिळणार आहे.
नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग बीडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा मार्ग कोणत्याही परिस्थिती पुर्ण करायचाच असा चंग माजी मंत्री पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली खा. प्रीतमताईंनी बांधलेला आहे. त्याअनुषंगानेच या रेल्वे मार्गाच्या कामात ज्या ज्या वेळी अडचणी येतील त्या त्यावेळी त्या अडचणी सोडविण्यासाठी खा. प्रीतमताई आपल्या जिवाचे रान करीत आहेत. त्यामुळेच सध्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिले आहे. सेट्रल रेल्वेने एप्रिल 2023 पासून आजपर्यंत 147.77 किमी मल्टीट्रॅकिंग (नवीन लाइन/दुहेरी/3री/4थी लाईन) पूर्ण केली.  3886.95 उीी ने या वर्षात नवीन ओळी/दुहेरी/3री/चौथी लाईनसाठी नियोजन केले. हा 4805.17 कोटींचा प्रोजेक्ट असून आतापर्यंत 3699 कोटींचा खर्च झाला आहे. आतापर्यंत अहमदनगर ते आष्टी (66.18 किमी) पर्यंत काम पुर्ण झालेले आहे. या आर्थिक वर्षात आष्टी ते एगनवाडी असे 66.12 किमीचे पुर्णत्वास जात आहे. इगनवाडी ते परळी 127.95 किमी एवढे अंतर असून हेही काम लवकरच पुर्ण होणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे. ही लाईन पुर्ण झाल्यास नगर आणि बीड जिल्ह्याचा संपर्क सुधारेल आणि या क्षेत्राचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. याचप्रमाणे आता मराठवाड्यातील चौथ्या रेललाईन दुहेरीकरणाच्या कामाचाही श्रीगणेश झाला आहे. परभणी- परळी वैजनाथ या 64 किमीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या जमिन अधिग्रहणाची अधिसुचना रेल्वे मंत्रालयाकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. यासाठीही खा. प्रीतमताईंनी सातत्याने प्रयत्न केले होते, या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा परळीसह बीडकरांना मोठा फायदा होणार आहे. या दुहेरीकरणामुळे नविन रेल्वेच्या गाड्याही भविष्यात वाढणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!