बीड

केबल, कॉपर वायर चोरी करणारी टोळी गजाआड, कॉपर चोरीचे दहा गुन्हे केले उघड,स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : जिल्हयातील टॉवर वरील कॉपर, रॉड, मोटारीचे कॉपर वायर चोरी वांरवार घडत असल्याने अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे करणारी टोळीचा शोध घेवून  गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांना दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी अशा प्रकारचे चोरी करणारी इसमांची विश्लेषण करून पोउपनि सुतळे यांचे पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार कॉपर वायर चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. यावेळी कॉपर चोरीचे दहा गुन्हे उघडकिस आली आहेत.
दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, नेकनुर,गेवराई, पाटोदा,अंमळनेर या भागातुन केबल/वायर चोरी हे रमेश चंदु पवार व त्याचे इतर साथीदार करीत आहेत. सदरची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोउपनि सुतळे यांना आरोपीचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे कामकाज देण्यात आले पोउपनि सुतळे यांनी पोउपनि तुपे यांचे मदतीने पथकासह संशयीत इसमांचा शोध धोत्रा शिवारात शोध घेवून शिताफीने इसम नामे 1) रमेश चंदु पवार, गणेश हरी पवार, सोमनाथ हरी पवार व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन केबल व वायर संदर्भात विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर आणखीन तीन साथीदारांसह तांदळवाडीघाट, रौळसगाव, लिंबागणेश,डोंगरकिन्ही, पाटोदा,पाली,खाडवी, रांजणी, गढी, पेंडगाव अशा एकुण दहा ठिकाणी केबल/वायर व इतर प्रकरच्या चोर्‍या केल्याचे सांगितले असून सदर चोरी केलेला वायर हे बीड येथील इसम नामे शंकर शिवराम गायकवाड रा.पांगरबावडी यास विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानंतर शंकर गायकवाड यास बीड येथे ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने वर नमुद इसमांसोबत स्वत:ची जितो वाहनासह चोरी केलेल्या असल्याचे निष्पन्न झालेले आहे.  वरील आरोपीतांकडुन पो.ठा.नेकनुर हद्दीतील(03) गुन्हे, पो.ठा.गेवराई हद्दीतील (03) गुन्हे, पो.ठा.बीड ग्रामीण हद्दीतील (02) गुन्हे, पो.ठा.पाटोदा हद्दीतील (01) गुन्हा, पो.ठा.अंमळनेर हद्दीतील (01) गुन्हा असे एकुण (10) गुन्हे केबल/वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले असून एकुण (2,77,500) रु चा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयातील 04 आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक असे एकुण 05 इसमांना पो.स्टे.नेकनुर पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आलेले असून इतर 04 निष्पन्न आरोपींना अटक करणे बाकी आहे. सदर टोळीकडुन अशा प्रकारचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास  पुढील तपास पो.ठा. नेकनुर,गेवराई, पाटोदा,बीड ग्रामीण,अंमळनेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत. सदरची कामिगरी ही मा.श्री. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री.संतोष साबळे, पोउपिन सुशांत सुतळे, पोउपनि संजय तुपे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह/रामदास तांदळे , मारुती कांबळे , बालकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोना/राजु पठाण, पोशि/अर्जुन यादव, पोह/नसीर शेख, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भागवत शेलार, बाळु सानप, बप्पा घोडके, चालक अतुल हराळे,  चालक मराडे व अश्विनकुमार सुरवसे, सर्व नेम. स्थागुशा बीड  यांनी  केलेली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!