बीड, दि.17(जिमाका), राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू झाले आहे.
त्यानुसार जिल्हयातील 4 लाख 96 हजार 856 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रु. 415.69 कोटी अनुदानाचे वितरण झाले असून उर्वरीत 3 लाख 32हजार 655 शेतकरी लाभाथ्र्यांपैकी 1लाख 63हजार 595 लाभार्थ्याच्या माहितीसंबंधी दुरुस्ती व अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे .तसेच 1 लाख 69 हजार 060 लाभार्थ्यांपैकी 73 हजार 942 लाभार्थ्यांनी ग्रामस्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी (Vk List) मधील अनुक्रमांकानुसार (Vk Number) नुसार आपले सरकार सेवा केंद्र / नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण (E-Kyo) करणे आवश्यक आहे. याची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
यानुसार VK List वरुन नंबर नोंद करुन आपले सरकार सेवा केंद्र वर EKYC आधार प्रमाणीकरण न केलेले शेतकरी संख्यामध्ये बीड तालुक्यातील 8 हजार 246,गेवराईतालुक्यातील 5 हजार 245, माजलगाव तालुक्यातील 7हजार 390, वडवणी तालुक्यातील 3 हजार 379, धारूरतालुक्यातील 3 हजार 618, अंबाजोगाईतालुक्यातील 2 हजार 499केजतालुक्यातील 9हजार 399 आष्टीतालुक्यातील 16 हजार 597 पाटोदातालुक्यातील 7 हजार 389, परळी तालुक्यातील 2 हजार 831 शिरुर कासार तालुक्यातील शिरूर 7हजार 349
असे एकूण 73 हजार 942 शेतकरी आहेत.
तसेच 95 हजार 118 शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती (आधार कार्ड व बँक पासबुक ची प्रत ) संबंधित गावचे
ग्रामसेवक / तलाठी यांचे कडे जमा करावी.