मुंबई, दि.14 (लोकाशा न्युज) ः कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका क्षेत्रातील आयुक्त गांभीर्याने वागत नाहीत. आपण रात्रं दिवस धावपळ करतो. पण अधिकारी मात्र सुस्तीत वागतात, अशी नाराजी भावना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचे आगमन होऊन पाच महिने झाले. तरीही जिल्हा व महापालिका क्षेत्रातील यंत्रणा कोरोना निर्मूलनाच्या कामात तरबेज झालेली नाही.कोरोना निर्मूलनासाठी आपल्या जिल्ह्यात किंवा महापालिका क्षेत्रात कसे उत्कृष्ट काम केले जात आहे याचे रसभरीत वर्णन सबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त सांगत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात तळागाळात जाऊन पाहतो तर परिस्थिती नेमकी उलटी असल्याचे दिसते, असे टोपे यांचे मत आहे.