बीड

बर्दापूरमध्ये एसपींच्या पथकाची जुगार अड्डयावर रेड, चार आरोपींवर गुन्हा दाखल

बीड-पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेल्या सपोनि गणेश मुंडे यांनी बर्दापूरमध्ये जुगार अड्डयावर धाड मारून दोघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळू माफियांच्या विरोधात कारवाईची मोहीम गतिमान केल्यानंतर तीन दिवसापूर्वी गणेश मुंडे यांच्यावर वाळू माफियांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये मुंडे व त्यांचे सहकारी वायबसे हे जखमी झाले होते.दोन दिवसांच्या विश्रांती व उपचारानंतर पुन्हा एकदा एसपींच्या पथकाने अवैध धंद्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आज बर्दापूरमध्ये मारलेल्या धाडीत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मटक्याची साहित्य व रोख रक्कम असा ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात मटका बुकीमालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!