बीड

दिंद्रुडमधील जलजिवनच्या पाच कोटींच्या कामात सावळा गोंधळ, झेडपीत अर्ध नग्न उपोषण मात्र तंबाखू चोळीत चोळीतच अधिकारी उपोषण स्थळी बसले येवून, शासकिय कार्यालय परिसरात धुम्रपान करण्यास सक्त मनाई मग लाड यांनी सोबत आणलेले लक्ष्मण हुले झेडपीचे जावाई आहेत का?


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : दिंद्रुड येथील जलजीवनच्या चार कोटी 68 लाख रूपयांच्या कामात मोठा सावळा गोंधळ असल्याचे समोर येत आहे. याअनुषंगानेच  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याकचे माजलगाव तालुकाध्यक्ष अकिल सय्यद हे काल झेडपीच्या पाणी पुरवठा कार्यालयासमोर उपोषणास बसले होते, त्यांनी याठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले. त्यांनी सुरू केलेले अर्धनग्न आंदोलन सोडविण्यासाठी पाणी पुरवठा आणि वॅप्कोसचे अधिकारी याठिकाणी आले खरे…मात्र यातील लक्ष्मण हुले नावाचे अधिकारी तंबाखू चोळताना आणि चोळलेली तीच तंबाखू तोंडात टाकताना उपोषण स्थळी पहायला मिळाले. मुळात शासकिय कार्यालयाच्या परिसरात कोणालाही धु्रमपान करता येत नाही, मग पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता लाड यांनी आपल्या सोबत आणलेले हुले हे झेडपीचे जावाई आहेत का? अशी चर्चा आता झेडपीच्या आवारात होवू रंगू लागली आहे. यावर सीईओ काय कारवाई करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.  
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे जलजीवनचे चार कोटी 68 लाख रूपयांचे काम मंजूर आहे, हे काम होळंबे कन्ट्रक्शनला मिळालेले आहे. मात्र एवढ्या मोठ्या कामात बोगसगिरी करण्याचा प्रयत्न होळंबे कन्ट्रक्शन करत आहे. त्याअनुषंगानेच या कामात बोगसगिरी होणार नाही,  हे पुर्ण काम दर्जेदार व्हावे याकरिता माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष अकिल सय्यद यांनी बुधवारी झेडपीच्या पाणी पुरवठा कार्यालयासमोर थेट कपडे काढून ठाण मांडली. त्यांचे हे अर्धनग्न आंदोलन पाहूण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी आंदोलनस्थळी आले. यातील काही मुद्दे हे वॅप्कोस या कंपनीशी संबंधित आहेत त्यामुळे कार्यकारी अभियंता श्री. लाड हे वॅप्कोसचे व्यवस्थापक लक्ष्मण हुले यांना आपल्या सोबत घेवून उपोषण स्थळी आले. यावेळी उपोषण कर्त्यासोबत चर्चा करत असताना हुले यांनी आपल्या खिश्यातील तंबाखू काढून ती चोळीत चोळीतच चर्चा सुरू ठेवली. जवळपास पाच ते दहा मिनीट ते तंबाखू चोळीत चोळीत चर्चा करत होते, तंबाखू चोळल्यानंतर त्यांनी ती आपल्या तोंडातही टाकली. यावरून पाणी पुरवठ्याचे आणि वॅप्कोसचे अधिकारी काम किती प्रमाणिकपणे करतात, त्यांना नियमांचे कसे आणि किती भान आहे हेच यातून स्पष्ट होते, वास्तविक पाहता कोणत्याही शासकिय कार्यालय आणि कार्यालयाच्या परिसरात धुम्रपान करता येत नाही, याचे थोडेही भान हुले यांना राहिले नाही, उपोषणस्थळी ते बिनधास्तपणे धुम्रपान कसे काय करू शकतात, ते झेडपीचे जावाई आहेत का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. परिणामी याप्रकरणावर आता झेडपीचे सीईओ अविनाश पाठक हे त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!