बीड

बीडमधील कुख्यात गुंडांकडून दोन गावठी कट्ट्यासह जिंवत काडतुस जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरनं 427/2023 कलम 3,25 आर्म अ‍ॅक्ट मधील फरार आरोपी नामे सुयोग उर्फ छोटया मच्छिंद्र प्रधान या आरोपीचा शिवाजीनगर भागात गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवून त्यास मोठ्या शिताफीने दिनांक 20/09/2023 रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे वरील गुन्हयाबाबत विचारपुस करत असतांना त्याने वर नमुद गुन्हयातील पुर्वी हस्तगत केलेले तीन गावठी पिस्टल त्यानेच विक्री करण्यासाठी आणले होते याची कबुल दिली. तसेच त्याचेकडून बुधवारी रोजी अधिक बारकाईने चौकशी केली असता त्याचे ताब्यातून पोलिसांनी दोन गावठी पिस्टल व 04 जिवंत काडतूस जप्त केली आहेत.सदर पिस्टल कोठून व कोणाकडुन आणले याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी आढावा बैठक घेवून अवैध धंदे व अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, बीड व मा. अपर पोलीस अधीक्षक, बीड यांनी मा. आय. जी. साहेबांचे आदेशाप्रमाणे कारवाई करणेबाबत पो. नि. स्थागुशा बीड यांना मार्गदर्शक करून सुचना दिलेल्या आहेत. आरोपी नामे सुयोग उर्फ छोटया मच्छिंद्र प्रधान (रा. माळीवेस बीड) याचे विरुध्द पुर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व आर्म अ‍ॅक्ट चे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडुन आणखीन इतर गुन्हे उघड होण्याची पोलिसांना शक्यता आहे. आरोपी विरुद्ध पो.ठा. शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. पुढील तपास पो.ठा. शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत. सदरची कामगिरी मा. श्री. नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावरकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/सचिन आंधळे, चालक / कृष्णा बागलाने, घायतडक स्था. गु.शा. बीड यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!