बीड

विविध उपक्रमांनी मराठवाडा मुक्ती संग्रामचे साजरे होणार अमृत महोत्सवी वर्ष, उद्यापासून 17 सप्टेंबरपर्यंत चालणार कार्यक्रम, सकाळी निघणार प्रभातफेरी तर 15 सप्टेंबरला मॅरेथॉन, गित गायन, व्याख्यान,पोवाडा, गौरव गीत अन् नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाकडे लक्ष वेधले जाणार, अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण यंत्रणा केली गतिमान


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : विविध उपक्रमांनी मराठवाडा मुक्ती संग्रामचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. आजपासून येत्या 17 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम चालणार आहेत. आज सकाळी शहरातून प्रभातफेरी तर उद्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गित गायन, व्याख्यान, पोवाडा गौरव गित अन् नाटकाच्या माध्यमातून यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले जाणार आहे. याअनुषंगानेच हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी आपली संपूर्ण यंत्रणा गतिमान केली आहे. बुधवारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेवून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा माहिती अधीकारी प्रशांत देठणकर, सहाय्यक माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांची उपस्थिती होती.
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा विभाग निजामी राजवटीतून मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामास यावर्षी 75 वर्षे पुर्ण होत आहेत, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने बीड जिल्हा मुख्यालयी आज दि. 14 सप्टेंबर 2023 ते दि. 17 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते हुतात्मा स्मारक ते रामकृष्ण लॉन्स, बीड येथे काढण्यात येणार आहे. तसेच गित गायनही आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच संध्याकाळी साडे सात वाजता सर्व नागरिकांसाठी शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे प्राध्यापक डॉ. सतिश कदम यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. उद्या दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी सात वाजता हुतात्मा स्मारक ते रिलायन्स पेट्रोल पंप व परत पुन्हा हुतात्मा स्मारक अशी मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच संध्याकाळी साडे सात वाजता रामकृष्ण लॉन्स येथे मराठवाडा मुक्ती संग्रामचे महत्व सांगणारे शाहीर बंडू खराटे यांचे पोवाडा व गौरव गीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी हुतात्मा स्मारक येथे हुतात्मांना अभिवान कार्यक्रम व पोलिस मुख्यालय बीड येथे ध्वजारोहन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच सायंकाळी साडे सहा वाजता हुतात्मा स्मारक बीड येथे दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी साडे सात वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त डॉ. सतीश सांळूके यांचे ‘हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम’ या विषयावर नाटक आयोजित करण्यात आले आहे. तरी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केले आहे. दरम्यान हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिर्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

अमृत महोत्सवी वर्षाचे बीड
जिल्ह्याला मिळणार मोठे गिफ्ट
या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. याअनुषंगानेच 17 सप्टेंबरच्या पुर्व संध्येला म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बीड जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागणार आहेत. या अनुषंगानेच हे अमृत महोत्सवी वर्ष बीड जिल्ह्याला मोठे गिफ्टच देवून जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!