बीड

कलेक्टर, एसपींचा दणका, गुंडगिरी करून दहशत पसरविणाऱ्या दोन गुंडांची हर्सुल कारागृहात रवानगी

बीड

बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे तसेच हातभट्टीची दारू तयार करुण विक्री करणाऱ्याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन 1) पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ पो.ठा.माजलगांव श. यांनी दि. 22/08/2023 रोजी इसम नामे जालिंदर लक्ष्मण जाधव वय 54 वर्षे रा. शेलापुरी ता. माजलगावं 2) स.पो.नि. श्री खोडेवाड पो.ठा. दिंद्रुड यांनी दि. 21/08/2023 रोजी इसम नामे विश्वभर सटवा मेंडके वय 52 रा. नित्रुड ता. माजलगांव यांचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचे दोन वेग-वेगळे प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केले होते.

सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे माजलगांव श. व ग्रामीण येथे हातभट्टीची दारु तयार करणे, जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे वगैरे स्वरुपाचे 06 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 04 गुन्हे मा. न्यायालयात न्यायप्रविष्ट असुन 02 गुन्हे पोलीस तपासावर आहे. सदर इसमावर यापुर्वी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. तसेच पो.ठा. दिंद्रुड हद्दीतील नित्रुड येथील इसम नामे विश्वभर सटवा मेंडके वय 52 रा. नित्रुड ता. माजलगांव याचे विरुध्द पो.ठा. दिंद्रुड येथे पोलीस अभिलेखावर हातभट्टी विषयक एकुण 05 दाखल आहेत. त्यापैकी 03 गुन्हे न्यायप्रविष्ठ गुन्हे असुन 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदर इसमाविरुध्द कलम 107 CrPC व कलम 93 म.दा. का. प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर दोन्ही इसम हे प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने हातभट्टीची दारु तयार करुन, ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होते. त्यामुळे पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. सदर इसम हे पोलीसांची नजर चुकवून हातभट्टीच्या दारुचा चोरटा व्यापार करीत होते.

सदर प्रकरणात श्रीमती. दिपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 11.09.2023 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर दोन्ही ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2023 / आरबी डेस्क- 1 /पोल- 1 / एम.पी. डी.ए.-11 व 12 दिनांक 11.09.2023 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो. नि. श्री. बल्लाळ पो.स्टे. माजलगांव शहर व सपोनि खोडेवाड पो.स्टे. दिंद्रुड यांना दिल्या होत्या. त्यांनी पो. नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय खबऱ्याचे आधारे ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने सदर इसमास अनु क्रमे दिनांक 11/09/2023 रोजी 23.19 वा. व 12/09/2023 रोजी 01.44 वा. ताब्यात घेवुन पोलीस ठाणे माजलगांव शहर व दिंद्रुड येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 12.09.2023 रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती कविता नेरकर, उपविपोअ माजलगांव श्री. पंकज कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक, पो.नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि बल्लाळ, सपोनि खोडेवाड, पोउपनि नन्नवरे, सोनटक्के पो.स्टे. माजलगांव शहर व बीड स्थागुशा चे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, विकी सुरवसे यांनी केलेली आहे. भविष्यातही हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!