परभणी/हिंगोली ।दिनांक ०९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुपारी औंढा नागनाथ येथील श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. आज दिवसभरात परभणी व हिंगोली जिल्हयात पंकजाताईंचं एवढं जोरदार स्वागत झालं की, डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं. दोन्ही जिल्हयात खासदार, आमदारांसह कार्यकर्त्यांनी परिक्रमेचं उत्स्फूर्त स्वागत केलं.
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा औंढ्याकडे मार्गस्थ झाली. गंगाखेड येथे आ. रत्नाकर गुट्टे, रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे यांनी वाजत-गाजत जंगी स्वागत केलं. दैठणा, पोखर्णी इथलं स्वागत स्विकारून पंकजाताई परभणीत आल्या, याठिकाणी खासदार संजय (बंडू) जाधव यांनी त्यांचं संपर्क कार्यालयात स्वागत केलं. शहरात चौका- चौकात कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर लावले होते. झिरो फाटा, जवळा बाजार येथे अतिशय उत्साह आणि जल्लोषात जोरदार स्वागत झालं. औंढ्यात त्यांना २१ फुटाचा पुष्पहार घालण्यात आला. इथे आ. तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांनी तर हिंगोलीत आ. संतोष बांगर यांनी पंकजाताईंचं मोठया जल्लोषात स्वागत केलं.
••••















