
( बीड प्रतिनिधी )
जीवनात राजकारण करत असताना मला काही नको हवय ते जनतेचे प्रेम, जनतेचे परम मिळवणे हे अवघड काम. शिवशक्ती परिक्रमा यात्रेत अक्षरश: कार्यकर्ते तुटून पडले. जागोजागी जंगी स्वागत झाले. सध्या गढूळ वातावरणात तुरटीचे काम करण्याची माझी इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेऊन, तोल सांभाळावा. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. अशी भावनिक साद घालून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आयोजित केलेला जंगी सत्कार त्यांनी स्वीकारला.
प्रत्येक युगानंतर बदल हवा असतो. तो बदल जवळच आहे. सर्वाना सोबत घेऊन जाणारा राजेंद्र मस्के सारखा चांगला माणूस माझ्या सोबत आहे. चांगल्या माणसांची आज राजकारणात गरज आहे. असे म्हणत राजेंद्र मस्के यांचे त्यांनी कौतुक केले. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची शिवशक्ती प्ररिक्रमा यात्रा नुकतीच बीड शहरात आली असताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी माहाराज पुतळा परिसरात दीड टन फुलांची उधळण करत, भव्य स्वागत करण्यात आले. भव्य मोटारसायकल रॅली चऱ्हाटाफाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली. यावेळी खा. डॉ प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ॲड. सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, सलीम जहागीर, जगदीश गूरखुदे, शांतीनाथ डोरले, अजय सवाई, सुनील मिसाळ, डॉ. अभय वणवे, अशोक लोढा, संतोष हांगे, भूषण पवार, दीपक थोरात, कपिल सौदा, अनिल चांदणे, शिवाजी मुंडे, किरण बांगर, प्रमोद रामदासी, पीटी चव्हाण,राजू शहाणे, पालसिंगनकर काका, गणेश पुजारी, बालाजी पवार, संध्याताई राजपूत, डॉ.जयश्रीताई मुंडे, मीराताई गांधले, शितलताई राजपूत, छायाताई मिसाळ, ॲड. संगीताताई धसे, वर्षाताई सानप, जमील भाई, बद्रिनाथ जटाळ, दुष्यंत डोंगरे, अश्विन शेळके, बाळासाहेब गात, गणेश लांडे, अनिल शेळके, महेश सावंत, सरपंच गुंदेकर, अण्णासाहेब भोसले, मच्छिंद्र सानप, उमेश खेडकर, लालासाहेब पन्हाळे, रवींद्र कळसाने, अजय ढाकणे, राकेश बिराजदार, विकास गव्हाणे यांच्याश भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
चौकट – दहा जेसीबी दीड टन फुलांची उधळण
पाचशे मोटार सायकलची भव्य रॅली
फटाक्यांची आतिषबाजी करत बिडकरांनी केले स्वागत















