सांगली / सोलापूर । दिनांक ०७।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आज दुपारी पंढरीत श्री विठूरायाच्या चरणी नतमस्तक झाल्या. मंदिर समितीच्या वतीने त्यांचं यावेळी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं.
सकाळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन पंकजाताई मुंडे पंढरपूर कडे रवाना झाल्या. सांगली येथे श्री गणेशाचे त्यांनी दर्शन घेतले, आ. सुधीर गाडगीळ, निता केळकर याप्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानी त्यांचं मोठया जल्लोषात कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. कवठे मंहाकाळ येथे खा. संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. सांगोला येथे स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरी भेट देऊन पंकजाताईंनी त्यांच्या परिवाराची विचारपूस केली. रस्त्यात मोहोळ येथे संजय क्षीरसागर यांनी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत त्यांचं जोरदार स्वागत केलं.
सोलापुरात सिध्दरामेश्वराचं तर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं घेतलं दर्शन
सोलापूर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात पंकजाताई मुंडे यांचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पंकजाताईंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वराचेही त्यांनी दर्शन घेतले. रात्रौ अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात आरतीच्या वेळी त्या उपस्थित राहिल्या. समर्थाचं व पालखीचं दर्शन त्यांनी घेतलं.
••••