बीड

पंकजाताई मुंडे यांनी घेतले नाशिकच्या प्रभू त्र्यंबकेश्वराचे दर्शन, शिव-शक्ती परिक्रमेच्या दुसर्‍या दिवशीही प्रचंड उत्साह अन् स्वागताचा सिलसिला सुरूच, गावागावात जागोजागी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली

नाशिक ।दिनांक ०५।
शिव-शक्ती परिक्रमेच्या आजच्या दुसर्‍या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सकाळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू त्र्यंबकेश्वराची पूजा, अभिषेक करून दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं.

शिव-शक्ती परिक्रमेचा आजचा दुसरा दिवस सुरू झालाच तो कार्यकर्त्यांच्या स्वागताने..सकाळी पंकजाताई मुंडे कार्यकर्त्यांचं स्वागत स्विकारून त्र्यंबकेश्वर कडे रवाना झाल्या. त्र्यंबकेश्वर मंदिरात त्यांनी विधिवत पूजा, अभिषेक करून त्यांनी दर्शन केले, यावेळी मंदिर समितीने त्यांचा सत्कार करून परिक्रमेला शुभेच्छा दिल्या.

गांवोगावी स्वागतासाठी प्रचंड गर्दी उसळली : शाळकरी विद्यार्थीनीही सहभागी

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पंकजाताई मुंडे भीमाशंकरला जाण्यासाठी रवाना झाल्या. रस्त्यात पिंपळगाव बहुला, नाशिक रोड, शिंदे टोल नाका, माळलाडी, सिन्नर, दोडी, नांदूर शिंगोटे, संगमनेर, आळे फाटा, नारायणगांव आदी ठिकाणी रस्त्यात जागोजागी त्यांचे वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पिंपळगाव येथे शाळकरी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकानं त्यांचं बहारदार स्वागत केलं. नाशिक येथे आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे यांनी पंकजाताईंचं स्वागत केलं.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!