बीड

शालेय पोषण आहार कामगारांचे एक कोटी 32 लाख खात्यात, सीईओ अविनाश पाठकांनी जिल्ह्यातील 5281 महिला कामगारांना दिली रक्षाबंधनाची भेट, सीईओंसह ईओंचे कामगारांनी मानले आभार




बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 5281 शालेय पोषण आहार कामगार महिलांना रक्षाबंधनाची मोठी भेट दिली आहे. पाठकांनी त्या महिला कामगारांचे ऑगस्ट महिण्याचे एक कोटी 32 लाख 2500 रूपयांचे मानधन त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे. याबद्दल सीईओ अविनाश पाठक, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांचे आभार मानले जात आहेत.

बीड जिल्ह्यातील झेडपीच्या शाळेत 5281 महिला कामगार पोषण आहार शिजविण्याचे काम करतात, या कामगारांना नेहमीच कोणत्यान कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, अशा वेळी त्यांना मोठ्या आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागते, अगदी हीच परिस्थिती लक्षात घेवून महिणा पुर्ण होण्याआधीच सीईओ अविनाश पाठक यांनी या महिला कामगारांना रक्षाबंधानाची भेट दिली आहे, रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिण्याचे एक कोटी 32 लाख 2500 रूपयांचे मानधन वर्ग केले आहे, हे मानधन महिलांच्या खात्यात जमाही झाले आहे. याबद्दल सीईओ अविनाश पाठक यांच्यासह शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांचे जिल्ह्यातून आभार मानले जात आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!