बीड

समाजसेवक विरेंद्र धोका यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला, जालन्यात तणावाचे वातावरण, हल्ल्यात धोका गंभीर जखमी


जालना, दि. 20 (लोकाशा न्यूज) : जालना येथील समाजसेवक तथा मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय नेते विरेंद्र धोका यांच्या पोटावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत. ही धक्कादायक घटना रविवारी दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान जालना येथे घडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील दिपक हॉस्पीटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. धोका यांच्यावर आशिष ओझा याने वार केले असून या घटनेने सध्या जालन्यात तणावाचे वातावरण आहे. वास्तविक पाहता जखमी आणि हल्ला करणारे एकमेकांच्या ओळखीचे असून सदर घटना आर्थिक देवाण-घेवाणीमधून घडली आहे. याबाबत जालना येथील बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हल्लेखोर फरार झाला असून त्याला लवकरच गजाआड करू, असे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी म्हटले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!