बीड

कोरोनामुक्त करणार्‍या काढ्याचा वाहक

बीड, दि. 13 :– गणीभाई बागवान, त्यांच्याकडे भले टेंडर म्हणून ही जबाबदारी आलेली असेल मात्र संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना आहार काढा, नाश्ता, तुळशीचा चहा देताना होत असलेले कष्ट निष्ठेचे प्रतिक आहे. व्यवसाय म्हणून नाही तर अगदी सेवा म्हणून सिद्ध झालेली ही जबाबदारी 4 महिने पुरे करत आलेली आहे. मोठी यंत्रणा उभी करून शक्य तेवढे काम करण्यात गणीभाईची यंत्रणा यशस्वी झालेली आहे. नित्यार्थ फॅसिलिटीज मॅनेजमेंट आणि सर्व्हिसेस नाशिक या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे काम निव्वळ पुण्य म्हणावे असेच आहे.
    बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आहेत त्यांना पूर्ण आहार देण्याचे काम गणीभाई बागवान व त्यांची यंत्रणा करत आहे. गेली साडे तीन महिने वेळेवर आहार देण्याचे काम केले जात आह, एखाद्या दिवशी उशीर झाला असेल मात्र शक्य तेवढे तत्पर काम करताना गनिभाई शेकडो रुग्णांचा सवाब घेत आहेत. बीडमधील विधी महाविद्यालय, आयटीआय कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील माजलगाव, शिरूर, आष्टी, केज, अंबाजोगाई, वडवणी, परळी, धारूर व लोखंडी सावरगाव येथे नित्यार्थ फॅसिलिटीज मॅनेजमेंट आणि सर्व्हिसेस नाशिक या संस्थेकडून इथे आहार दिला जातो, यासाठी जिल्ह्यात अब्दुल गणीभाई बागवान यांच्याकडून तत्पर यंत्रणा उभी केलेली आहे.
—-
भाच्चीचा निकाह आणि गणीभाईंच्या डोळ्यात पाणी  
भागातील या समस्या घेऊन जेव्हा जेवण देणारे गणी भाईंकडे लोकाशा टीम  पोहचली  तेव्हा पाहितले की त्यांनी सर्व तयारी केलेली होती, सर्व केंद्रांवर जेवण पाठवले जात होते. गणीभाईंनी लहानाची मोठी केलेली भाच्ची काल  विवाहबद्ध झाली, व्हिडीओ कॉर्लवर ती लेक रडताना पाहून वाईट वाटले, गेली 3 महिने हा माणूस कुठेही गेला नाही, केवळ व्यवसाय म्हणून कुणी हे करत नाही. गणीभाईंच्या डोळ्यातील पाणी त्यांचं समर्पण सिद्ध करणारे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!