बीड

बीड जिल्हा पोलिस दल 24 तास तुमच्या सेवेत तत्पर!!

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नियम पाळा, नियम तोडणार्‍यांवर कडक कारवाई होणार - एसपी हर्ष पोद्दार

बीड, दि. 12 : बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ही वाढती संख्या रोखण्यासाठीच बीड, परळी, माजलगाव, केज, आष्टी आणि अंबाजोगाई या सहा शहरामध्ये दहा दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. याअनुषंगानेच या सर्वच शहरामध्ये जिल्हा पोलिस दल सज्ज झालेले आहे. या लॉकडाऊनच्या अनुषंगानेच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जिल्हावासियांना स्वत:ची, कुटूंबाची आणि समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. माझ्यासह संपूर्ण जिल्हा पोलिस दल तुमच्या सेवत 24 तास तत्पर राहणार आहे. आपल्याला कोरोनाला रोखायचे आहे, त्यामुळे प्रशासनाने दिलेले सर्व नियम पाळा, जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पोद्दार यांनी म्हटले आहे.
एकेकाळी शुन्य असलेल्या बीड जिल्ह्याला कोरोनाने पुर्णपणे घेरलेले आहे, दररोज कोरोनाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, माजलगाव, केज, अंबाजोगाई, आष्टी आणि परळीत दहा दिवस लॉकडाऊन जाहिर केलेेले आहे. हे लॉकडाऊन कालपासून सुरू झालेले असून येत्या 21 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत ते कायम राहणार आहे. या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभुमिवरच काल सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जनतेला आवाहन केले आहे. ते यावेळी म्हणाले की, मागच्या तीन चार महिण्यापासून बीड जिल्ह्यातील जनतेला कोरोनाचा सामना करावा लागत आहे, कोरोनाची वाढती रूग्ण संख्या रोखण्याच्या अनुषंगानेच सहा शहरांमध्ये दहा दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे, यादरम्यानच्या काळात जनतेने प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कर्मचारी आपला जीव मुठीत धरून सेवा देत आहेत. माझ्यासह संपूर्ण बीड जिल्हा पोलिस दल तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे,  त्यामुळे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळा, स्वत:चा जिव धोक्यात घालू नका, सध्याचा काळ संकटाचा असल्यामुळे  स्वत:सह आपल्या कुटूंबाची आणि समाजाची समाजाचे रक्षण करा, कोरोनाच्या घातक संकटातून आपल्याला बाहेर यायचे आहे, त्याला पुर्णपणे रोखायचे आहे, त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक नियमाचे पालन करा, जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी म्हटले आहे.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!