बीड

कलेक्टरांच्या संकल्पाला जिल्ह्याची साथ, बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती सरसावल्या, जनजागृती अभियानालाही मिळाली गती तर सकाळी बीडमधून निघणार दोन हजार विद्यार्थ्यांची रॅली


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्‍नाकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते, जिल्ह्यात वाढत चाललेले बालविवाह रोखण्यासाठी त्या शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगानेच बीड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांच्या याच संकल्पाला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची खर्‍या अर्थाने साथ मिळत आहे. यासाठी सुरू केलेल्या जनजागृती अभियानालाही गती मिळाली आहे.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय बीड व राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह जनजागृती कार्यक्रम पथनाट्यद्वारे राबविण्यात आले, बीड जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण पाहता महाराष्ट्रात बीड जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर असून 42 टक्के मुलींचे बालविवाह या ठिकाणी होतात असे निदर्शनास आले आहे,बालविवाहमुळे मुलीचा शारीरिक मानसिक शैक्षणिक विकास खुंटतो मुलीचे शिक्षण थांबल्यामुळे तिच्या स्वतःचा व कुटुंबाचा विकास होत नाही मुलगी सामान्यतः एक ओझे मानली जाते आणि पारंपारिक रित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे, मुलीला आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर पालकांसाठी आपल्या जातीतच आपल्या तोला मोलाचे कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजता असते ,मुलींना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात ,संस्कृती परंपरा यांच्या नावाखाली सुद्धा अनेक बालविवाह केले जातात ,काही ठिकाणी काम करण्यासाठी जोडीदार म्हणून सुद्धा बालविवाह केले जातात बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडीनि कामगारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोयता पूर्ण करण्यासाठी ही बालविवाह केले जातात, शिक्षणाचा अभाव बालविवाहाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीचा अभाव यामुळे ही बालविवाह होतात लवकरात लवकर लग्न म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग असेही मानण्यात येते,बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलीचे विवाह करून दिला तर हुंडा कमी द्यावा लागतो व लग्नालाही खर्च कमी येतो परंतु हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा देणे घेणे हाही गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही मुलीचा बालविवाह होऊ नये व ती कायम शिक्षणाच्या मूळ प्रवाहात राहावी ती जर शिकली तर तिचा व तिच्या कुटुंबीयांचा विकास होण्यास हातभार लागतो व त्याबरोबरच राष्ट्राचाही विकास होतो अशाप्रकारे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चा पथनाट्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील 40 गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुधीर ढाकणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी बीड यांचे मोलाचे सहकार्य लाभले पथनाट्य मध्ये लक्ष्मीकांत दोडके, रवी धुताडमल, गणेश अवंतकर, तत्त्वशील कांबळे,ज्योती गायकवाड , कीर्ती शिंदे, स्नेहल मुळे, महेश जगताप, मिथुन जोगदंड, कबीर जाधव अमोल गायकवाड आदी कलाकारांनी पथनाट्यद्वारे जनजागृती केली.

बालविवाह रोखण्यासाठी सोनिया
हंगेंचेही मोठे काम
बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे, आपल्या जिल्ह्यातील हेच वाढते प्रमाण रोखण्यासाठी बालविवाह निर्मूलन प्रकल्पाच्या वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सोनिया हंगे यांचेही मोठे काम आहे. नेहमीच जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्यासह प्रशासनासोबत खंबीरपणे राहून त्या जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी खर्‍या अर्थाने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनाही सातत्याने यश येत आहे.

सकाळी बीडमधून निघणार दोन हजार
विद्यार्थ्यांची रॅली
बीड जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या अनुषंगानेच सकाळी दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता शहरातील शिवाजी चौक, कारंजा, बलभीम चौक, माळी वेस, सुभाष रोडने रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, सीईओ अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह तब्बल दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान या रॅलीचा जिल्हा संकूल मैदानावर समारोप होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!