परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली.
परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चारजण चहा पिण्यासाठी आले.त्यांनी हॉटेल मधील नोकरांकडे सिगारेट चे पाकीट मागितले.
हे पाकीट महाग का दिले म्हणून या ठिकाणी ग्राहकांनी हुज्जत घातली.बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यन्त गेले.ग्रहकांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला.अशी माहिती माध्यमांना दिली.गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेल चे शटर लावून घेतले ,त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.