बीड

वादग्रस्त स्टेट्समुळे आडसमध्ये दोन गटात वाद, जमावावर दगडफेक, तिघे जखमी, धारूर ठाण्याचे ठाणेदार विजय आटूळेंनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली,दोन्ही गटावर केले गुन्हे दाखल, 16 आरोपींना ठोकल्या बेड्या


धारूर, दि. 6 (लोकाशा न्यूज) : मोबाईलवरील वादग्रस्त स्टेट्समुळे आडसमध्ये दोन गटात वाद झाला. यावेळी जमावावर दगडफेकही झाली, यामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ दाखल होत धारूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय आटूळे यांनी आडस येथील चिघळलेली परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटावर त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी 16 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

याबाबत धारूर ठाण्याचे पोलिस हेड कॉन्सटेबल प्रशांत मस्के यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल केली आहे. पाच ऑगस्ट रोजी आडस येथे हजर असताना साडे आठ वाजता मिळाली की, छत्रपती शिवाजी चौक आडस येथे हिंदु व मुस्लिम समाजामध्ये दंगल चालू आहे, अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सदर बातमीबाबत प्रभारी अधिकारी विजय आटोळे यांना माहिती देवून आम्ही व सोबत पोह घुले असे छत्रपती शिवाजी चौक आडस येथे गेलो असता त्या ठिकाणी बरेच नागरिक आपआपसात दंग करीत होते, त्याठिकाणी बराचसा जमाव होता आम्ही व पोलिस अंमलदार घुले यांनी जमावाची पांगवापांगव केली, जमावाची पांगवापांगव केल्यानंतर सदर ठिकाणी काही ईसमाकडे अधिक चौकशी करता त्यांच्याकडून समजले की आरबाज शेख रा. आडस या मुलाने त्याच्या मोबाईलवरील स्टेटस वर किंग व त्याच्या खाली ईतिहास गवाह है की जिसकी बरावटी नही की जा सकती उसकी बदनामी करना सुरू कर दी जाती है अशा आशयाचा मजकूर लिहून त्याखाली औरंगजेबचा फोटो लावून हिंदु समाज मानसात ठेच पोहोचेल अशा आशयाचा संदेश देणारे स्टेटस मोबाईल ठेवले. त्यामुळे सदर मुलाचे स्टेटस काही हिदु मुलांनी पाहिल्यानंतर चिडून जावून आरबाज शेख याच्या घरी हिंदु समाजाचे लोक गैरकायद्याची मंडळी जमवून एकत्रितरित्या जावून जबा विचाररून त्याच्याबरोबर वादावादी करून त्याला चापटा मारल्या व त्याला घेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक आडस येथे आणले. त्यास तेथे आणल्याचे समजल्यानंतर काही मुस्लीम मुलांचा समुदाय तेथे आला व त्यांनी हिंदु मुलांना काय झाले तुम्ही असे का करता असे विचारले. त्यावरून दोन्ही समुदायात बाचाबाची सुरू झाली व दोन्ही समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याचे समजते. त्यामध्ये मुस्लिम समाजातील अरबाज शेख, ईम्रान ईसाक शेख, सय्यद गुलाम रसूल गफू, महेबूब मुसाखान पठाण, ईब्राहिम बाबन शेख, रफिक जिशान बागवान, शेख मोईज युनूस, नवीदखॉ रस्तुमखॉ पठाण, सय्यद शकुर अहम्मद गफूर, अफ्फान नवीद पठाण, अझर अफसर शेख, नयुम उस्मान शेख, मोहसिन मुबारक पठाण व इतर दहा ते पंधरा ईसम सर्व रा आडस जि.बीड व हिंदु समुदायातील राहूल गणेश डांगे, किरण गणेश डांगे, सुरेश भुजंगराव गंगात्रे, रूषीकेश शिनगारे, रामचंद्र वचिष्ट शिर्के, शुभम बालासाहेब ढोले व इतर दहा ते पंधरा सर्व रा. आडस ता. केज यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकत्रीत येवून चिडून जावून परस्परविरोधी गटावर दगडफेक केली त्यात रूषीकेश सुधाकर राजमाने, विजय उर्फ बबलू शेंडगे, बिलाल आयुब पठाण सर्व रा. आडस यांना भांडणामध्ये दुखापत झाली. त्यांच्या अशा कृतीमुळे जमखी ईसमाचा मृत्यू घडून आला असता अशी कृती त्यांनी केली. आरोपी आरबाज शेख याने त्याच्या मोबाईल क्रमांकावर स्टेटस वरून किंग व त्याच्या खाली ईतिहास गवाह है जिसकी बरावटी नही कि जा सकती उसकी बदनामी कर दी जाती है अशा आशयाचा मजकूर लिहून त्याखाली औरंगजेबचा फोटो ठेवून हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या व आरोपी राहूल गणेश डांगे, किरण गणेश डांगे, सुरेश भुजंगराव गंगात्रे, रूषीकेश सखाराम शिनगारे, रामचंद्र वचिष्ट शिरके, शुभम बालासाहेब ढोले,रूषीकेश सुधाकर राजमाने, विजय उर्फ बबलू शेंडगे व ईतर दहा ते पंधरा जणांनी एकत्र रित्या चिडून जावून आरबाज शेख याने हिंदु समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवल्याने त्यास पकडून आडस येथील शिवाजी चौक येथे आणले असता त्याची माहिती मुस्लिम समाजातील वरील मुलांना मिळाल्याने त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकत्रीत येवून परस्परविरोधी गटावर दगडफेक करून दंगल करून अशा कृतीमुळे जखमी ईसमांचा मृत्यू घडून आला असता अशी कृती केली व आरोपी आरबाज शेख याने हिंदु समाजविरोधी आक्षेपार्ह मजकुर ठेवून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन केले म्हणून वरील सर्व ईसमाविरूध्द कलम 308, 295 (अ), 324,323, 143,147, 149,337,160 भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!